Wednesday, October 30, 2024
Homeक्राईम न्यूजकरमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी देणार : आमदार संजयमामा शिंदे

करमाळा शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी देणार : आमदार संजयमामा शिंदे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

करमाळा : करमाळा शहराला अनियमित पाणीपुरवठा व अस्वच्छतेचात्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात आमदार संजयमामा शिंदेयांनी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसहसर्व विभाग प्रमुखांची बैठक आज घेतली. शहराला पाणीपुरवठाकरणाऱ्या दहीगाव पाणी पुरवठा योजनेत तांत्रिक बिघाडामुळेवारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. यावर कायमस्वरूपी मार्गकाढण्यासाठी लवकरच आवश्यक निधी आपण उपलब्ध करून देऊअशी ग्वाही आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

करमाळा नगर परिषदेला पाणीपुरवठा करण्यासाठी १९९३ साली सुरू झालेल्या योजनेसाठी दहीगाव येथून पाणी उपसा करणारे २४० अश्वशक्तीचे दोन व २०० अश्वशक्तीच्या विद्युतपंपांमध्ये वारंवार बिघाड होत असल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होणे, शहरातील मारवाड गल्ली, राशीन पेठ, सिध्दार्थ नगर, भिमनगर, किल्ला वेस, मेन रोड, श्री कृष्णाजी नगर याभागात सन १९९८ साली पाईप लाईन टाकल्या असून या कालबाह्य झालेल्या आहेत.

शहरातील नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नाही व वारंवार तक्रारी येत आहेत. त्याकरिता सदरील पाईप लाईन DI किंवा HDEP या बदलने, शहरांतर्गत स्वच्छता करणे, शहर विकास आराखडा मंजूर करून घेणे यासंदर्भात यावेळी चर्चा झाली. या बैठकीसाठी करमाळा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सचीन तपसे, आकाश वाघमारे बांधकाम अभियंता, समीर नदाफ लेखापाल, शशांक भोसले नगर अभियंता, विनोद राखुंडे अंतर्गत लेखा परीक्षक, पियुष शिंपी आस्थापना प्रमुख, कमलाकर भोज, पाणीपुरवठा विभाग हे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments