Tuesday, January 14, 2025
Homeक्राईम न्यूजकबुतर जा जा, म्हणण्याची आली वेळ...! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार; अन्नपदार्थ...

कबुतर जा जा, म्हणण्याची आली वेळ…! पिंसासह विष्ठेतील जंतुमुळे पसरतायेत आजार; अन्नपदार्थ टाकू नये, महापालिकेचे नागरिकांना आवाहन

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर खाद्य टाकू नका असे आवाहन महापालिकेने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद न देता खाद्य टाकणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. कबुतरांच्या पिसासह विष्ठेतून बाहेर पडणाऱ्या जंतुमुळे ‘हायपर सेंसिटिव्ह न्यूमोनियाचा आजार होत असून, हा फुप्फुसाशी संबंधित आहे. हा आजार होण्याचे प्रमाण ६० ते ६५ टक्के असून, नागरिकांनी कबुतरांना उघड्यावर मोठ्या प्रमाणावर, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

यासंदर्भातील फलक महापालिकेने विविध ठिकाणी लावले आहेत. मुठा नदीच्या काठावर शनिवार, नारायण पेठेजवळी घाटांवर मोठ्या प्रमाणावर धान्य टाकले जात आहे. या ठिकाणी कबुतरांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसत आहे.

इमारतींच्या गॅलरीमध्ये कबुतरं विष्ठा करतात. त्या वाळलेल्या विधेची सफाई करताना त्याचे सूक्ष्म धुळीत रूपांतर होते, तेव्हा ते पूल कण हवेत जातात. या कणांमध्ये विविध बुरशीचे बीजाणू, जीवाणू आणि इतर सेंद्रिय पदार्थ असतात, जे मानवी शरीराला अपायकारक असतात. विष्ठेमुळे अनेकदा खोकला, स्वास लागणे, ताप आणि यकवा येऊ शकतो.

कबुतराच्या पिसांनी आणि विष्ठेमुळे दुषित झालेल्या भागाशी संपर्क येऊ देऊ नका. तोंडाला कपडा बांधून विष्ठा काढा किंवा संरक्षक उपकरणे घालावे. प्रभावित भाग योग्यरित्या स्वच्छ करून निर्जंतुक करावा. जर त्याच्या संपर्कामुळे आरोग्य समस्या निर्माण झाली तर वैद्यकीय सल्ला घ्यावा कबुतरांचा त्रास वाढून त्यामुळे शहरामध्ये फुप्फुसासंबंधीचे आजार ६० ते ६५ टक्के असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर व इमारतीमध्ये कबुतरांना खायला देऊ नये, असे आवाहन महापालिकेने फलक लावून केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments