Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजकपडे विक्रेत्यावर गुन्हा दाखलः भिक्षेकऱ्यासाठी पाण्याची रिकामी बाटली मागितल्याने केले चाकूने वार

कपडे विक्रेत्यावर गुन्हा दाखलः भिक्षेकऱ्यासाठी पाण्याची रिकामी बाटली मागितल्याने केले चाकूने वार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

अंपग व भिक्षेकरी व्यक्तीला पाणी देण्यासाठी कपडे विक्रेत्याला पाण्याची बाटली मागितल्याच्या रागातून त्याने एकावर चाकूने वार करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारवाड्या जवळील फुटपाथवर घडला.

याप्रकरणी अनोळखी आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुणाल बापू शेलार (23, रा. कसबा पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. कुणाल यांचे वडील सलूनचे साहित्य घेऊन येत होते. त्यावेळी त्यांना वाटेत एक अपंग भिक्षेकरू भेटला. त्याने फिर्यादी यांना पिण्यासाठी पाणी मागितले. त्यास पाणी देण्यासाठी त्यांनी बाजुच्या फुटपाथवरील अनोळखी कपडा विक्रेत्याला पाण्याची रिकामी बाटली मागतली. मात्र त्या कपडा विक्रेत्याने फिर्यादीशी हुज्जत घालत मी येथे पाणी देण्यासाठी बसलो आहे का असे बोलून वाद घातला व शिवीगाळ केली. तसेच त्या कपडे विक्रेत्याने त्याच्या जवळील छोटया चाकूने फिर्यादीच्या वडीलांच्या हातावर हल्ला करत त्यांना गंभीर जखमी केले.

दारू पिऊन पोटच्या मुलीशी अश्लिल चाळे

दारू पिऊन पोटच्या मुलांना मारहाण करून 13 वर्षाच्या मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या साताऱ्यातील पित्यावर कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी साताऱ्यातील पित्यावर त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मागील एक वर्षापासून साताऱ्यात फिर्यादीच्या सासरी घडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments