इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पालेभाज्यांचा आहारात समावेश करणे फायद्याचे ठरते. कारण, त्यात अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे ते मजबूत होतात. तसेच रोगांपासून बचाव करण्यास मदत होते. हे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास आणि तुमचे हृदय व मन निरोगी ठेवण्यास मदत करते. लोक गाजर, मुळा अशा अनेक भाज्या कच्च्या खातात. मात्र, अशा काही भाज्या आहेत त्या कच्च्या कधीही खाऊ नये. परिणामी, गंभीर समस्या जाणवू शकते.
शिमला मिरची याचा यामध्ये समावेश होतो. या भाजीचा वरचा भाग नेहमी काढून बिया काढून घ्या. नंतर गरम पाण्यात नीट धुवा. त्याच्या बियांमध्ये टेपवर्म अंडी असू शकतात. याने गंभीर आजार होऊ शकतो. तसेच पालक भाजी देखील कच्ची खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. कारण, यामध्ये ऑक्सलेटची पातळी खूप जास्त असते. त्यामुळे किडनी स्टोनचा धोका वाढतो. म्हणून, खाण्यापूर्वी ते पूर्णपणे शिजवा. पालेभाज्यांच्या रसातही पालकाची पाने टाकू नयेत.
कोबीचाही यामध्ये समावेश होतो. कारण, या भाजीच्या आत टेपवर्म नावाचा किडा आणि त्याची अंडी असू शकतात. हे डोळ्यांनी पाहता येत नाहीत. जर ते रक्तप्रवाहात पोहोचले तर ते गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकते. म्हणून, ते खाण्यापूर्वी नेहमी गरम पाण्यात शिजवा. जर ते आपल्या आतड्यांमध्ये, रक्तप्रवाहात शिरले तर ते सिस्टिक सिरोसिस, फेफरे, डोकेदुखी आणि यकृताचे नुकसान देखील करू शकतात. त्यामुळे या भाज्या कच्च्या खाणे टाळले पाहिजे.