इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोरः किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणातून दोनटोळक्याने फ्री स्टाईल हाणामारी करून दगडफेक केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील इंदिरानगर परिसरातील घोरपडे वस्तीजवळ आज गुरुवारी (ता.27) रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये पहिल्यापासूनच वाद सुरू आहेत. या वादातून ही हाणामारी झाल्याची माहिती मिळत आहे. तसेच ही हाणामारी रस्त्यावरच सुरू होती. यावेळी दोन्ही गट शिवीगाळ करून मोठमोठ्याने आरडाओरड करत होते. मात्र, दोन्ही बाजूने दगडफेक सुरू सुरु होताच दोन्ही गटाची पळापळ झाली. या फ्री स्टाईल हाणामारीचे व्हिडिओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहेत.