Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज कटरच्या सहाय्याने सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या महिलांना अटकः पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची...

कटरच्या सहाय्याने सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या महिलांना अटकः पुणे गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई, 7 गुन्हे उघडकीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पीएमपी प्रवासा दरम्यान गर्दीचा फायदा घेत महिल्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कटरने कट करून चोरी करणाऱ्या दोन महिलांना गुन्हे शाखेच्या युनिट १ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून १३ तोळ्यासह ७ लाख ८७ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सुरेखा ऊर्फ नग्गी छोटू जाधव (वय ३४), शितल ज्ञानेश्वर गायकवाड (वय ३३, दोघीही रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी महिलांची नावे आहेत.

वडगाव शेरी येथील बस स्थानकावर प्रवाशांच्या हातातील बांगड्या चोरणाऱ्या महिला थांबल्याची माहिती पोलीस अंमलदार अनिकेत बाबर यांना मिळाली होती. यानंतर सुरेखा जाधव आणि शितल गायकवाड यांना ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता २० हजार किमतीचे २ मोबाईल आणि एक कटर मिळून आले.

त्यांच्याकडे अधिक तपास केला असता शिवाजीनगर, फरासखाना, डेक्कन पोलीस ठाण्यातच्या हद्दीत चोरी केल्याचे उघकीस आले. त्यांच्याकडून १३ तोळ्यासह ७ लाख ८७ हजार २५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता २४ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शब्बीर सय्यद, सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, रुक्साना नदाफ, अजय थोरात यांच्या पथकाने केली.

 

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments