Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजकंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण...

कंबरेला गावठी पिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला अटक; स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांची कामगिरी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

शिरूर, (पुणे) : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कंबरेला गावठीपिस्टल लावून फिरणाऱ्या रेकॉर्डवरील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. शिरुर बायपास रोडवरील बंद पडलेल्या दि नाना स्पॉट ढाब्याजवळ शनिवारी (ता. 01) ही कारवाई करण्यात आली. या करवाईत आरोपीकडून गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. दिपक बबन गुंजाळ (रा. गोलेगाव रोड, शिरूर, ता. शिरूर जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर शिरुर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शिरुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने गस्त घालीत होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला एका बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, आरोपी दिपक गुंजाळ हा शिरुर बायपास रोडवरील बंद पडलेल्या दि नाना स्पॉट ढाब्याजवळ उभा आहे. तसेच त्याच्या कंबरेला गावठी पिस्टल लावले आहे.

मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिपक गुंजाळ याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली. त्याच्याजवळ गावठी पिस्टल व मॅग्झीनमध्ये एक जिवंत काडतुस आढळले. गुंजाळ याच्याकडून एकूण 40 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. सदरचे अवैध गावठी पिस्टल बाळगण्यामागे त्याचा नेमका कोणता हेतू होता, याचा तपास पोलीस करीत आहेत.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजय जाधव, राजू मोमीन, मंगेश थिगळे, सागर धुमाळ यांनी केली असून पुढील तपास शिरुर पोलीस करत आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments