इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
चाकण : कंपनीत कामावर सायंकाळी सात वाजता वेळेत ये म्हणून फोन केला असता चिडलेल्या एका कामगाराने एकास शिवीगाळ व दमदाटी करत हेल्मेटने पोटावर व डोक्यावर जबर मारहाण केली. तसेच कानाखाली मारल्याने कानातून रक्त येऊन तुला जिवंत सोडणार नाही, तुझ्यावर व कंपनीवर खोट्या केसेस करतो, अशी धमकी दिल्याप्रकरणी कामगारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाकण एमआयडीसीतील निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीतील निर्मल पॉली प्लास्टिक इंडस्ट्रीज कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर गुरुवारी (दि. २१ नोव्हेंबर) सायंकाळी सात वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला. मयूर हनुमंत शिर्के (वय ३०, रा. हिवरे कुंभार, ता. शिरूर) यांनी महाळुंगे इंगळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.