Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजेच कॉन्कोर कंपनीचे शेअर्स तेजीत, स्टॉक वाढीचे कारण काय?

कंटेनर कॉर्पोरेशन म्हणजेच कॉन्कोर कंपनीचे शेअर्स तेजीत, स्टॉक वाढीचे कारण काय?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Concor Share Price | कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजेच कॉन्कोर या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॉन्कोर स्टॉक 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होता. आज देखील कंपनीचे शेअर्स सुसाट तेजीत धावत आहेत.

कॉन्कोर कंपनीने नुकताच आपले तिमाही निकाल जाहीर केले आहे. आता या सरकारी कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे आज सोमवार दिनांक 6 नोव्हेंबर 2023 रोजी कॉन्कोर स्टॉक 2.70 टक्के वाढीसह 733.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

तिमाही कामगिरी :

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कॉन्कोर कंपनीने 2194 कोटी रुपये महसूल संकलित केला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीच्या महसूल संकलनात 11 टक्के वाढ झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने 21 टक्क्यांच्या वाढीसह 367 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

लाभांश तपशील :

कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीने सेबीला कळवले आहे की, कॉन्कोर कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 3 रुपये अंतरिम लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच कॉन्कोर कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 5 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या स्टॉकवर 60 टक्के लाभांश वाटप करणार आहे. कॉन्कोर कंपनीने लाभांश वाटप करण्याची पात्रता निश्चित करण्यासाठी रेकॉर्ड तारीख म्हणून 16 नोव्हेंबर 2023 हा दिवस निश्चित केला आहे.

शेअरची कामगिरी :

मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कॉन्कोर कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 5 टक्क्यांच्या वाढीसह 716.90 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील 6 महिन्यांत कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

RELATED ARTICLES

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुणे महापालिकेची कारवाई; रस्ते, पदपथ ठिकठिकाणी आढळणारी १३९ बेवारस वाहने जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : महापालिकेच्या हद्दीत रस्ते, पदपथावर ठिकठिकाणी आढळणाऱ्या बंद अथवा बेवारस अवस्थेतील वाहनांविरोधात महापालिका कारवाई करत आहेत. सुरुवातीला या...

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

Recent Comments