Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजकंटेनरच्या अपघातात चालक जागीच ठार; शेवाळेवाडी येथील घटना

कंटेनरच्या अपघातात चालक जागीच ठार; शेवाळेवाडी येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

हडपसर, (पुणे) : हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेवाळेवाडी जवळील रूकारी पेट्रोल पंपासमोर कंटेनरचा अपघात झाला आहे. या अपघातात कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कंटेनरवर बांधलेले लोखंडी वस्तू केबिनवर आदळल्याने हा अपघात झाला आहे. गुरुवारी १६ मे रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तुळशीराम गोविंद करे (वय-४२ रा. नंदेश्वर, मंगळवेडा, सोलापूर) असे मृत्युमुखी पडलेल्या चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोखंडी मालाने भरलेला कंटेनर पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. शेवाळेवाडी येथील रूकारी पेट्रोल पंपासमोर कंटेनर आला असता अचानक वाहन आल्याने चालकाने ब्रेक दाबला. त्यामुळे भरधाव वेगात असलेल्या कंटेनरवरील लोखंडी वस्तूला बांधलेला पट्टा तुटून चालकाच्या केबिनवर येऊन आदळल्या. यामध्ये चालकाच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अपघात एवढा भीषण होता की, कंटेनरच्या केबिनचा चक्काचूर झाला आहे. प्रवासी, स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी शर्तीचे प्रयत्न करून चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी उपचारापूर्वीच चालकाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments