इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः कर्वे रस्त्यावरील एका औषधांच्या दुकानाचे शटर उचकटून १ लाख २८ हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत कैलास नाबराज चौधरी (वय ३० वर्ष, रा. थेरगाव) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ३ अनोळखी चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार कैलास चौधरी यांचे कर्वे रस्त्यावरील गरवारे महाविद्यालयाच्या परिसरात पुनमचंद मेडीकल शॉप नावाचे औषधाचे शॉप आहे. गुरुवारी (दि. १९) पहाटे साडेचार ते सकाळी नऊच्या दरम्यान तीन चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकावुन दुकानात प्रवेश केला. त्यानंतर गल्ल्यातील १ लाख २८ हजारांची रोकड चोरून नेली.
दरम्यान, दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच फिर्यादी कैलास यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीसांनी परिसरातील सीसीटीव्हीची पाहणी केली असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करीत आहेत.