Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजऔरंगजेबाचा फोटो ठेवणाऱ्या इसमाची येरवडा कारागृहात रवानगी ; बारामती पोलिसांची कारवाई

औरंगजेबाचा फोटो ठेवणाऱ्या इसमाची येरवडा कारागृहात रवानगी ; बारामती पोलिसांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या इसमावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्याची येरवडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. रविवारी बारामती शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी गोपनीय सूत्रांमार्फत पोलिसांना माहिती मिळाली की, एका व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअप स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवत धार्मिक भावना भडकवणारा मजकूर पोस्ट केला आहे. सदर माहिती मिळताच बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीस ताब्यात घेतले.

त्याच्या मोबाईलची तपासणी केली असता, वादग्रस्त स्टेटस आणि धार्मिक तेढ निर्माण करणारा मजकूर आढळून आला. यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 127 नुसार प्रस्ताव तयार करून अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार यांच्यासमोर सादर करण्यात आला.

सुनावणीदरम्यान आरोपीच्या कृत्यामुळे सामाजिक शांतता भंग होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट झाल्याने, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून त्याला येरवडा मध्यवर्ती कारागृहात पाठविण्यात आले आहे. बारामती शहर पोलीस सोशल मीडियावर सतत नजर ठेवून असून, कोणत्याही धर्माविरोधात चिथावणीखोर मजकूर पोस्ट करणाऱ्या इसमांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

दरम्यान, सध्या छत्रपती संभाजी महाराज बलिदान मास आणि पवित्र रमजान महिना सुरू असून, आगामी काळात होणाऱ्या उत्सवांच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर अफवा आणि धार्मिक तेढ वाढवणारे स्टेटस ठेवू नयेत, असे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बारामती सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments