Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

ओतूर – ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांनी सुटका केली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांनी दिली.

समीर गजानण निवतकर (मुळ रा. वेंगुर्ला, जि. सिंधुदूर्ग सध्या रा. कोथरूड, पुणे) असे सुटका केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याच्या फिर्यादी वरून ओतूर पोलीसांनी विश्वजीत महादेव ढोमसे (रा. ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे) याचे विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत ओतूर पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, ता. २८ फेब्रुवारी रोजी दुपारी ओतूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी एल. जी. थाटे यांना माहिती मिळाली की समीर गजानन निवतकर यास ओझर येथील मोरया लॉजच्या रूम नं. १०४ मध्ये डांबुन ठेवले असून सदरच्या रूमला बाहेरून कुलुप लावण्यात आले आहे.

त्यानंतर थाटे यांनी तात्काळ पोलीस हवालदार नरेंद्र गोराणे, पोलीस नाईक संदिप लांडे, पोलीस शिपाई संदिप भोते यांचे पथक तयार करून ओझर येथील मोरया लॉज या ठिकाणी विविध सुचना देवून पाठवले. तेथे गेल्यावर त्यांना समजले की, विश्वजीत ढोमसे याने येथे एका व्यक्तीला रूममध्ये कोंडुन तो पुणे या ठिकाणी गेला असल्याचे पोलीस पथकास समजले. ओझर येथील मोरया लॉजमध्ये रूम नं. १०४ ला बाहेरून कुलुप होते. तसेच आतमध्ये समीर निवतकर यास कोंडलेले दिसुन आल्या नंतर समीर निवतकर यांची सुखरूप सुटका करण्यात आली.

समीर निवतकर यांनी आरोपी विश्वजीत महादेव ढोमसे यांचे ११,५०,००० रू. शेअर मार्केट मध्ये गुंतवून सदरचे अकाउंट समीर निवतकर हे स्वतः ऑपरेट करत होते. त्याने आरोपीस सुरूवातीस १,८०,००० रू. नफा कमावून दिला. परंतू त्यानंतर आरोपीला समीर निवतकर याच्यावर शंका आल्याने गुंतवणुक केलेले पैसे आताच्या आता मिळवुन दे, असे म्हणुन ता. २७ फेब्रुवारी रोजी समीर निवतकर यास ओझर येथील मोरया लॉजमध्ये डांबुन ठेवले होते.

ओतूर पोलीसांनी समीर निवतकर यांची ता. २८ रोजी सुटका केल्यानंतर त्यांच्या तक्रारीवरून आरोपी विश्वजीत महादेव ढोमसे (रा. ओझर, ता. जुन्नर, जि. पुणे) याचे विरूध्द ओतूर पोलीसात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंदा भवारी हे करत आहेत.

सदरची कारवाई पंकज देशमुख, पोलीस अधीक्षक साो. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, जुन्नर उपविभागीय अधिकारी रविंद्र चौधर यांचे मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. थाटे व त्यांच्या टीमने केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments