इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली | 14 ऑक्टोबर 2023 : शेअर बाजारात काही सरकारी कंपन्यांची कामगिरी जोरदार आहे. या सरकारी कंपन्यांनी गुंतवणूकदारच नाही तर तज्ज्ञांचा भरवसा जिंकला आहे. बाजारातील मोठ्या कंपन्यांपेक्षा या कंपन्यांनी तगडा रिटर्न दिला आहे. एखाद्या दिग्गज फलंदाजासारखीच त्यांनी तडाखेबंद बॅटिंग केली आहे. या सरकारी कंपनीच्या शेअरने चमकदार कामगिरी बजावली आहे. या स्टॉकने अवघ्या 6 महिन्यात 150 टक्क्यांचा परतावा दिला आहे. सध्या हा स्टॉक 100 रुपयांच्या आत आहे. ही कंपनी एकाचवेळी अनेक क्षेत्रात काम करत आहे. येत्या काही दिवसांत हा शेअर लांब पल्ला गाठेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
MMTC चा ब्रँड
सरकारी कंपनी MMTC ने ही कामगिरी बजावली आहे. या कंपनीचा शेअर तुफान तेजीत आहे. ही सरकारी कंपनी सोने-चांदीच्या नाण्यांच्या विक्रीसह इतर वस्तूंची विक्री करते. कंपनीने लिथियम, कोबाल्ट आणि सिलिकॉन सारख्या क्षेत्रातही दबदबा तयार केला आहे. त्यामुळे येत्या काळात ही कंपनी मोठी झेप घेईल. तिचा व्यवसाय वाढेल.
30 रुपयांचा शेअर पोहचला 75 रुपयांवर
एमएमटीसी लिमिटेडचा शेअर 6 महिन्यांपूर्वी केवळ 29.95 रुपयांवर होता. सध्या हा शेअर 75.05 रुपयांवर पोहचला आहे. गेल्या 6 महिन्यात या शेअरने 150.58 टक्क्यांची वृद्धी नोंदवली. केंद्रीय मंत्रिमंडळाने खाण, खनिजकर्म अनियमात संशोधन केले आहे. यामध्ये लिथियम, नियोबियम आणि रेअर अर्थ एलिमेंट्स सारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या रॉयल्टीबाबत नवीन तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा या कंपनीला मिळणार आहे.
दीड महिन्यात 77 टक्के रिटर्न
केंद्र सरकारने लिथियम, कोबाल्ट आणि सिलिकॉन खनिजासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचा परिणाम कंपनीच्या शेअरवर दिसत आहे. ही खनिजं देशात इलेक्ट्रिक वाहन, ग्रीन एनर्जी आणि ग्रीन इकोनॉमी वाढीसाठी महत्वाची भूमिका अदा करणार आहे. गेल्या दीड महिन्यात या कंपनीचा शेअर 77 टक्क्यांनी वधारला आहे. येत्या काही दिवसात या शेअरमध्ये अजून वृद्धी दिसू शकते, असा तज्ज्ञांचा दावा आहे.
शेअरमध्ये येईल तेजी
तज्त्रांच्या मते, एमएमटीसीचा शेअर काही दिवसांत मोठा पल्ला गाठू शकतो. हा शेअर लवकरच 85 टक्क्यांचा भाव गाठू शकतो. पण शेअर बाजार हा जोखीमेचा आहे. त्यामुळे गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आणि बाजारातील घाडमोडींचा अभ्यास असणे आवश्यक आहे.