इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पपरा गुतपणुका जानिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टाण्णप्पा सायबर सेलच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये दुबईमधील बँकेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यासह आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारांशी संबंध असलेल्या आठ जणांना अटक करण्यात आले आहे. आरोपींनी काळेवाडी येथील एका वृद्धाची ९९ लाखांची फसवणूक केली होती.
महादेव उर्फ मधुकर गंगाधर कटके (वय-४४, रा. नवी मुंबई), मसुद आलम सिद्दीकी (वय ४८, रा. जोगेश्वरी, मुंबई), मोहम्मद अफझल सलमानी (वय-४९, रा. गोरेगाव), तौसिफ जैत्रुद्दिन सैय्यद (वय-४०, रा. मुंबई), सागर ब्रम्हदेव भोसले (वय-३८, रा. लासुर्णे, ता. इंदापुर), इम्रान मोहम्मद हसन सय्यद (वय-४४, रा. कळवा), प्रणव प्रविण दळवी (वय-३०, रा. बोरीवली), दानिश दिलावर साठी (वय-वय २४, रा. मुंब्रा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी रहाटणी येथील एका वृद्धाला नफा देण्याचे आमीष दाखवून त्यांची ९९ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास करताना पैसे हस्तांतरित करण्यात आलेले एक बैंक अकाऊंट मुंबई येथील असल्याचे समोर आले.
त्यानुसार, सायबर पोलिस मुंबई रवाना झाले. संबंधित खातेधारकाने त्याचा मामा महादेव कटके याच्या सांगण्यावरुन बँक खाते काढून संपूर्ण किटसह त्याच्याकडे दिले असल्याचे सांगितले. पोलिसांनी कटके याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुंबईतून आठ जणांना अटक केली. आरोपी दुबई खील अबुधावी बँकेमध्ये तीन वर्षापासून स्थायी कर्मचारी आहे. तो दुवई येथील त्याच्या साथीदाराच्या सांगण्यावरुन भारतात येऊन साथीदारांच्या मदतीने सायबर गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले. पोलिस निरीक्षक रविकिरण नाळे, सहायक निरीक्षक प्रवीण स्वामी यांच्या पथकाने ही कामगिरी केली.