Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने 18 लाखांना गंडा: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास घरबसल्या काम...

ऑनलाईन काम देण्याच्या बहाण्याने 18 लाखांना गंडा: सेवानिवृत्त कर्मचाऱ्यास घरबसल्या काम देण्याचे सांगत फसवणूक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

सेवानिवृत्त झालेल्या एका ज्येष्ठ नागरीकास घरबसल्या काम देण्याच्या बहाण्याने, हॉटेल रिव्हयु लाईक करुन शेअर केल्यास चांगल्याप्रकारे परतावा देतो असे सांगून ऑनलाइन १८ लाख ४२ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अज्ञात विविध टेलीग्राम आयडी धारक व बँक खातेधारक यांच्यावर लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

याप्रकरणी उमेश मधुकर कल्याणकर (वय-५९) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अज्ञात आरोपींनी टेलीग्राम चॅनेल व लिंक धारक यांनी तक्रारदार उमेश कल्याणकर यांच्यासोबत संपर्क करुन, तक्रारदार यांना हॉटेल रिव्हयु लाईक करुन शेअर केल्यास भरघोस मोबदला मिळेल, असे सांगितले. तक्रारदार यांना पहिल्या कामाच्या मोबदल्याच्या स्वरुपात ४८ हजार ४५९ रुपये देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक रकमेचे अमिष दाखवून मोठया प्रमाणात गुंतवणूक केल्यास अल्पावधीत चांगला परतावा देऊ, असे सांगून आरोपींनी त्यांना विविध बँक खात्यावर १८ लाख ४२ हजार रुपये भरण्यास भाग पाडून सदर रकमेचा कोणता परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे.

टास्कच्या बहाण्याने दहा लाखांची फसवणूक

कोथरुड परिसरात गणेशनगर येथे राहणारे मिहीर गोविंद ढेरे (वय-४४) यांच्याशी व्हॉटसअप व टेलिग्रामद्वारे वेगवेगळ्या अज्ञात व्यक्तींना संर्पक करुन पार्ट टाईम जॉब देण्याचे अमिष दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करुन ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास चांगल्याप्रकारचा परतावा देण्याचे अमिष दाखवून तक्रारदार यांना प्रिपेड टास्ककरिता दहा लाख ५४ हजार रुपये विविध बँक खात्यावर भरण्यास भाग पाडण्यात आले. परंतु कोणताही परतावा तसेच मुळ रक्कम परत न करता त्यांची सदर रकमेची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास कोथरुड पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments