इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
लोणी काळभोर : ऑनलाईनच्या बदल्यात कॅश देण्यास नकारदिल्याने एका टोळक्याने कोयत्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना कदमवाकवस्ती येथील पालखी जवळील पाण्याच्या टाकीसमोर शुक्रवारी (ता.21) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यात बेकरीत काम करणारे तिघेजण गंभीर जखमी झाले आहे. अनिश कलवा मलिक (वय 50), बाबू कलवा मलिक (वय 45), आवेश बिलाल मलिक (वय 18) असे जखमी झालेल्या तिघांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिश मलिक व बाबू मलिक हे नात्याने एकमेकांचे भाऊ आहेत. तर आवेश मलिक हा या दोघांचा पुतण्या आहे. मलिक हे पाण्याच्या टाकीसमोर गुलस्था बेकरी चालवित आहेत. दरम्यान, गुरुवारी (ता. 20) रात्री आरोपींनी मलिक यांना ऑनलाईनच्या बदल्यात कॅश मागितली होती. तेव्हा मलिक यांनी कॅश देण्यास नकार दिला होता. याचाच राग मनात धरून आरोपींच्या 4 ते 5 जणांच्या टोळक्याने मलिक यांच्या बेकरीवर हल्ला केला. या हल्ल्यात मलिक, त्याचा भाऊ व पुतण्या गंभीर जखमी झाले आहेत. तर हल्लेखोरांनी बेकरीची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी जखमींना लोणी काळभोर येथील विश्वराज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती तेथील डॉक्टरांकडून मिळत आहे.
दरम्यान, हल्ला केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले आहेत. पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर आहेत. पुढील कार्यवाही लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.