Sunday, December 10, 2023
Home क्राईम न्यूज ऑनलाइन स्कॅम्सचा धसका, क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्याच्या नावाने दाखवली भीती, OTP मागून...

ऑनलाइन स्कॅम्सचा धसका, क्रेडिट कार्ड ब्लॉक केल्याच्या नावाने दाखवली भीती, OTP मागून लावला लाखोंचा चुना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल बऱ्याचशा गोष्टी ऑनलाइन केल्या जातात. पैसे काढणे, पैसे भरणे, ऑनलाइन ट्रॅन्झेंक्शन्स यांचा बराच वापर केला जातो. मात्र तंत्रज्ञानाच्या या मायावी जगात धोकेही तितकेच आहेत. ऑनलाइन स्कॅम्सच्या घटना गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना मोठा फटका बसतो, मेहनतीने कमावलेले पैसे गमावले जातात आणि मनस्ताप होतो तो वेगळाच. नवी मुंबईतील एका महिला डॉक्टरला ऑनलाइन लिपस्टीक मागवणे महागात पडले. ३०० रुपयांच्या लिपस्टीकपायी तिने एक लाख गमावले. ही घटना अगदी ताजी असतानाच आता ऑनलाइन घोटाळ्याचे आणखी एक प्रकरण उजेडात आलं आहे.

महापालिकेतील एका इंजिनिअरला याचा फटका बसला असून त्याने जवळपास दीड लाख रुपये गमावले आहे. या वरिष्ठ अभियंत्याला एकूण 1.47 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आणि मनस्ताप झाला तो तर वेगळाच. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

क्रेडिट कार्ड ब्लॉक झाल्याचा आला फोन

पोलिसांनीदिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्ती ही बीएमसीच्या जल व्यवस्थापन विभागाशी संलग्न आहे. त्या व्यक्तीला काही दिवसांपूर्वी एका बँकरचा फोन आला आणि तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक करण्यात आले आहे, असे त्याला सांगण्यात आले. ते कार्ड पुन्हा सक्रिय किंवा अॅक्टिव्हेट करायचे असेल तर काही वैयक्तिक माहिती द्यावी लागेल आणि मोबाईलवर एक वन-टाइम पासवर्ड (OTP) शेअर करावा लागेल असे तक्रारदार इसमाला सांगण्यात आले.

त्याच्या सूचनेनुसार, तक्रादरा व्यक्तीने त्याची वैयक्तिक माहिती दिली तसेच मोबाईलवर आलेला एका ओटीपीही समोरच्या व्यक्तीशी शेअर केला. मात्र त्यानंतर त्याच्या बँक अकाऊंटमधून एकदा तब्बल 99 हजार रुपये आणि नंतर 48 हजार रुपये डेबिट झाल्याची मेसज आला. ते पाहून तो हादरलाच. त्यानंतर त्या इसमाने त्या बँकरला फोन करून पैशांबद्दल विचारणा केली. तेव्हा तुमचे पैसे परत करण्यात येतील, असे सांगण्यात आले. मात्र बऱ्याच कालावधीनंतरही पैसे परत न मिळाल्याने पीडित इसमाने पुन्हा त्या बँकरला कॉल करण्याचा प्रयत्न केला असता, तो नंबर झाल्याचे दिसून आले. आपली फसवणूक करून लाखो रुपये लुटण्यात आल्याचे त्याच्या लक्षात आले आणि त्याने तातडीने गोवंडी पोलिसांत धाव घेत सायबर फ्रॉडची तक्रार दाखल केली. याप्रकरणी गोवंडी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

महिला डॉक्टरला लिपस्टीक मागवणे महागात पडले

हे प्रकरण नवी मुंबईतील आहे. तेथे एका महिला डॉक्टरला ऑनलाइन लिपस्टीक मागवणं प्रचंड महागात पडलं. कारण अवघ्या 300 रुपयांच्या लिपस्टीकपायी त्यांना तब्बल 1 लाख रुपयांचा चुना लागला आहे. सायबर भामट्यांनी त्यांच्या खात्यातून लाखभर रुपये सहज उडवले. यामुळे त्या डॉक्टरचे आर्थिक नुकसान तर झालेच पण त्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला तो वेगळाच.

नवी मुंबईतील या डॉक्टरने 2 नोव्हेंबर रोजी एका ई-कॉमर्स पोर्टलवर लिपस्टिकची ऑर्डर दिली होती. काही दिवसांनी त्या डॉक्टरला यासंदर्भात कुरिअर कंपनीकडून एक मेसेज आला आणि तुमच्या लिपस्टीकची डिलीव्हरी झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. मात्र त्या महिलेला लिपस्टीक काही मिळाली नाही. उलट कुरिअर कंपनीचा माणूस बोलतोय असे सांगत भामट्यांनी तिला फसवत एक लाख रुपये लुटले.

RELATED ARTICLES

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

प्रवासात गहाळ झालेली रोख रक्कम व सोन्याचे दागिने परत; पोलिसांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) नालासोपारा: मुंबईतून वसईत ओला कॅबने प्रवास करत असताना गहाळ झालेले ८० हजारांची रोख रक्कम व ५ लाख रुपये किंमतीचे...

देहू-आळंदी रस्त्यावर ट्रकच्या धडकेने महिलेचा जागीच मृत्यू, अपघातानंतर चालक पसार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) चिखली (पुणे) : देहू-आळंदी रस्त्यावरील मुख्य चौक म्हणून ओळख असलेल्या तळवडे चौकात दुपारी एका गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकने...

ई-चालान भरा; नाहीतर लोकअदालतमध्ये हजर व्हा! १७ लाख वाहनचालकांना नोटीस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबईत दिवसेंदिवस वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या एकूण १७ लाख १०...

स्पार्कल कँडल’ कारखाना स्फोट प्रकरणी २ महिलांसह चौघांवर गुन्हा; एकाला अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : 'स्पार्कल कँडल' बनविणाऱ्या कारखान्यात स्फोट झाल्याप्रकरणी जागा मालक, कारखाना चालक तसेच दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला....

Recent Comments