Tuesday, February 20, 2024
Home क्राईम न्यूज ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलात ? घरबसल्या अशी नोंदवा तक्रार

ऑनलाइन फ्रॉडला बळी पडलात ? घरबसल्या अशी नोंदवा तक्रार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

Cyber Crime : सध्या सायबर क्राईमच्या केसेसमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. फसवणूक करणारे भामटे हे लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन युक्त्या वापरत असता. नेहमी सावध रहा, सुरक्षित रहा असं सांगितलं जातं. तरीही अनेक लोकं फसवणुकीला बळी पडतात आणि कष्टाने कमावलेले पैसे गमावतात. तुम्हालाही सायबर फ्रॉडचा फटका बसला असेल तर अशा वेळी काय करावं, सायबर क्राईमबद्दल कुठे तक्रार करावी, घरच्या घरी हे कसं करता येईल, त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

सरकारची एक अधिकृत साईट आहे जी अशा घटना घडल्यावर खूप उपयोगी पडते. कारण तक्रार नोंदवण्यासाठी तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज पडत नाही, तुम्ही घरी बसूनही सहज तक्रार सहज नोंदवू शकता.

या स्टेप्स करा फॉलो

1. तुम्हालाही सायबर क्राईमचा फटका बसला असेल किंवा फसवणूक झाली असेल आणि त्यासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर सर्वप्रथम https:// cybercrime.gov.in/ या साईटवर जा. तुम्हाला नाव उघड करायचं नसेल तर तुम्ही अज्ञात व्यक्ती बनूनही तक्रार दाखल करू शकता.

2. वेबसाइटला भेट दिल्यानंतर, होमपेज वर File a complaint या पर्यायावर क्लिक करा. त्यांच्या टर्म्स अँड कंडीशन्स Accept करून पुढल्या पेजवर जावे. यानंतर Report other cybercrime ऑप्शनवर क्लिक करा.

3. यानंतर, citizen login ऑप्शनवर क्लिक करून, नाव, ईमेल आणि फोन नंबर ही माहिती भरा. त्यानंतर, तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर OTP येईल, कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करा.

4. पुढील पानावर तुम्हाला General Information, Cybercrime Information, Victim Information आणि Preview असे चार ऑप्शन्स दिसतील. प्रत्येक विभागात तुम्हाला आवश्यक ते तपशील, माहिती भरावी लागेल.

5. सगळी माहिती भरल्यानंतर, ती पुन्हा एकदा, नीट वाचा आणि नंतर सबमिट बटण दाबा. त्यानंतर तुम्ही पुढील पानावर पोहोचाल जिथे तुम्हाला घटनेशी संबंधित स्क्रीनशॉट किंवा फाइल्स शेअर कराव्या लागतील. डिटेल्स टाकल्यानंतर Save and Next वर टॅप करा.

6. जर तुम्हाला कोणाबद्दल संशय असेल तर तुम्हाला पुढील पानावर ती माहिती द्यावी लागेल. माहितीची पडताळणी (verify) केल्यानंतर सबमिट बटण दाबा. तक्रार नोंदवल्यानंतर, तुम्हाला एक मेसेज आणि ईमेल मिळेल ज्यामध्ये कंप्लेंट आयडी आणि इतर तपशील लिहिलेले असतील.

cyber Crime Helpline Number : हे नक्की लिहून ठेवा

1. जर तुम्हाला ऑनलाइन ऐवजी हेल्पलाइन नंबरवर कॉल करून तक्रार नोंदवायची असेल तर तुम्ही 1930 वर कॉल करू शकता. हा नॅशनल सायबर क्राइम हेल्पलाइन नंबर आहे.

2. जर तुमची आर्थिक फसवणूक झाली असेल, तर तुम्ही या नंबरवर कॉल करू शकता आणि नाव, संपर्क तपशील, तुमचे अकाऊंट डिटेल्स आणि ज्या खात्यात पैसे ट्रान्स्फर झाले आहेत त्या अकाऊंटचा तपशील यासारखी काही महत्त्वाची माहिती देऊन तक्रार नोंदवू शकता.

RELATED ARTICLES

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पार्किंगच्या वादातून महिलेस जिवंत जाळण्याचा प्रयत्नः टोळक्याने वाहनांची तोडफोड करत खराडी भागात दहशत माजवली

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुण्यातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून पोलिसांना ती नियंत्रित आणण्यात अपयश येत आहे. पार्किंगच्या वादातून एका टोळक्याने चंदननगर परिसरात थेट...

अंमली पदार्थाचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्तः मिठाच्या गोडाऊनमधून 3.50 कोटींचे अंमली पदार्थ जप्त; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अंमली पदार्थ विक्रीचे आंतरराष्ट्रीय रॅकेट उधवस्त केले आहे. तीघा आरोपींना अटक करुन त्यांच्या ताब्यातून तब्बल...

70 लाखांसाठी अपहरण: 12 वर्षीय अल्पवयीन मुलाची साताऱ्यातून सुटका; पोलिसांच्या प्रयत्नांना यश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) 12 वर्षांच्या मुलाचे 70 लाखांसाठी अपहरण करण्यात आले होते. भारती विद्यापिठ पोलिसांनी सातारा पोलिसांच्या मदतीने पीडित मुलाची सुटका केली...

पुण्यात पब, रेस्टोबार, रूफटॉप हॉटेल अन हुक्का पार्लर रडारवरः कलम 144 चे नियम लागू; बेशिस्तांविरूद्ध कडक कारवाईचा सीपींचा इशारा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे शहरात विविध इमारतींच्या टेरेसवर सुरू असलेले अनधिकृत पब, टेरेस हॉटेल आणि अवैध धंद्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे....

Recent Comments