Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजएसीबीकडून गुन्हा दाखलः वीज कनेक्शन जोडणीच्या अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञाची...

एसीबीकडून गुन्हा दाखलः वीज कनेक्शन जोडणीच्या अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी महावितरणच्या तंत्रज्ञाची लाचेची मागणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

इमारतीत नवीन वीज जोडणीसाठी करीत स्थळ पाहणी अहवालात त्रुटी न ठेवण्यासाठी २४ हजारांची लाच मागणाऱ्या महावितरण तंत्रज्ञाच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत लाच मागितल्याचे निष्पन झाले.

योगेश गोकुळ पाटील असे लाचखोर तंत्रज्ञाचे नाव आहे. याप्रकरणी पाटील यांच्याविरुद्ध चतुः शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ४० वर्षीय बांधकाम व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांनी एका इमारतीचे नुतनीकरण केले आहे. त्या इमारतीमध्ये वीज मीटर कमी होते. यामुळे नवीन ४ वीज मीटर कनेक्शन जोडणीसाठी महावितरणकडे अर्ज केला होता. तंत्रज्ञ योगेश पाटील याने स्थळ पाहणी अहवालात त्रटी न ठेवणेसाठी एका मीटरसाठी ६ हजार असे चार मिटरसाठी २४ हजारांची मागणी केली होती.

तक्रारदार यांना लाज द्यायची नसल्याने त्यांनी याबाबत रेसिपीकडे तक्रार दाखल केली त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने पंचासमक्ष पडताळणी केली योगेश पाटीलने २४ हजाराच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन झाले. याप्रकरणी पाटीलवर चतुःशृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विद्युलता चव्हाण, पोलीस हवालदार सरिता वेताळ, पोलीस शिपाई दिनेश माने यांनी ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments