इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
अहमदनगर | 4 नोव्हेंबर 2023 : लाच मागणं हा सर्वात (bribe) मोठा गुन्हा आहे. मात्र तरीही लोकांची काम करून देण्यासाठी अनेक जण लाच मागत असतात. अशाच एका कामासाठी मोठ्या रकमेची लाच मागून स्वीकारणाऱ्या अधिकाऱ्याला चांगलाच दणका बसला आहे. लाचलुचपत विभागाच्या नाशिक पथकाने नगरमध्ये मोठी कारवाई केली आहे. लाच घेतल्या प्रकरणी एमआयडीसीचे दोन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. एक कोटी रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आलीय महाराष्ट्रातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड आणि धुळे कार्यालयातील कार्यकारी अभियंता गणेश वाघ असे लाचखोर अधिकाऱ्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली. त्यांनी तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका इसमाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे वरिष्ठ अधिकारी नगरमध्ये दाखल झाले.
त्यानंतर रात्री उशीराच्या सुमारास अधिकाऱ्यांनी छापा टाकून लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतले. अहमदनगरच्या एमआयडीसीच्या नगर कार्यालयातील सहायक अभियंता अमित गायकवाड हा सध्या ताब्यात असून पुढील तपास सुरू आहे.