Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजएलरो आणि युनिकॉर्न हाऊस पबला पोलिसांचा दणकाः दोन्ही पब सिल : 29...

एलरो आणि युनिकॉर्न हाऊस पबला पोलिसांचा दणकाः दोन्ही पब सिल : 29 लाखांची सामग्री जप्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे शहरातील पब, बार, रुफ टॉप हॉटेल आणि रेस्टॉरंट यांना रात्री दीड पर्यंतची वेळ ठरवून दिलेली असताना देखील पुणे पोलिसांच्या या आदेशाला धुडकावून विना परवाना साऊंड सिस्टीम वाजवीत पब उघडे ठेवण्यात येत आहेत. अशाच एलरो आणि युनिकॉर्न या दोन पबला गुन्हे शाखेने दणका दिला आहे. कल्याणी नगरमधील दोन्ही पबवर कारवाई करत तब्बल २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात साऊंड सिस्टिम, तंबाखूजन्य हुक्का फ्लेवर, हुक्का पॉट आदी साहित्याचा समावेश आहे. तसेच दोन्ही पब सिलबंद केले आहेत.

याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), अमन इदा शेख (३०, रा. विकास नगर, लोहगाव), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी (रा. लोहगाव) यांच्यावर भादवि कलम १८८, २९१, ३४ व सिगारेट व अन्य तंबाखू उत्पादने महाराष्ट्र सुधारणा अधिनियम २०१८ चे कलम ७ (२) २०(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही करवाई अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर, सुनील तांबे, वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिकेत पोटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे यांच्या पथकाने केली आहे.

कल्याणीनगर येथील सेरेब्रह्म आयटी पार्क बी ३ या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावर एलरो नावाचे रुफ टॉप हॉटेल व पब आहे. ८ एप्रिल रोजी रात्री दीड ते सकाळी पावणे सहा वाजण्याच्या दरम्यान हा पब सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी छापा मारला आणि नेमून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ ही आस्थापना चालून ठेवून मोठमोठ्याने साऊंड सिस्टिम वाजवण्यात येत असल्याचे समोर आले. येथून सतरा लाख रुपयांची साऊंड सिस्टिम, साऊंड बॉक्स, कन्सोल, लाईट कंट्रोलर.

यासोबतच ३ लाख ८७ हजार ८४१ रुपयांचे तंबाखूजन्य हक्क फ्लेवर, हुक्का पॉट आदी साहित्य मिळून वीस लाख ८७ हजार ८४१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

तर, पोलीस शिपाई संदीप कोळगे यांच्या तक्रारीवरून संदीप हर्षवर्धन सहस्त्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (३०, रा. सह्याद्री हॉस्पिटल जवळ, येरवडा), रश्मी संदेश कुमार (रा. औंध), सुमित चौधरी (लोहगाव) यांच्या विरोधात दुसरा गुन्हा नोंद केला आहे. सेरेब्रह्म आयटी पार्क कल्याणी नगर या बिल्डिंगच्या आठव्या मजल्यावरच हॉटेल युनिकॉन हाऊस नावाचा आणखी एक पब या सर्वांनी चालवलेला होता. येथून ७ लाख ९१ हजार १४९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments