Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई: येरवाड्यातील अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांची कारवाई

एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध कारवाई: येरवाड्यातील अट्टल गुन्हेगारावर पोलिस आयुक्तांची कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेची कारवाई केली आहे. पोलिस आयुक्तांची ही ९७ वी कारवाई आहे.

शाहरुख सईद खान (वय २७, रा. नागपुर चाळ, येरवडा, पुणे) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे. शाहरुख खान हा येरवडा पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने लोणीकंद व येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजवली आहे. आरोपीने त्याच्या साथीदारांसह पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये तलवार, कोयता, यासारख्या हत्यारांसह दुखापत, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. त्याच्यावर मागील तीन वर्षात ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपी शाहरुख खान याला स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी पोलिस आयुक्त यांना पाठवला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शाहरुख खान याला एमपीडीए कायद्यान्वये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृह, चंद्रपूर येथे एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.

झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

भरधाव दुचाकी झाडावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना वारजे भागातील तपोधाम सोसायटीच्या आवारात घडली. उमेश विजय मारणे (वय २८, रा. ऑक्सिजन व्हॅली, नन्हे, आंबेगाव) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस कर्मचारी गौरी राजगुरू यांनी वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दुचाकीस्वार उमेश तपोधाम परिसरातून निघाला होता. नियंत्रण सुटल्याने भरधाव दुचाकी झाडावर आदळली. अपघातात उमेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments