Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजएटीएम मशीन मध्ये फेरफारः पळविले 3 लाख; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

एटीएम मशीन मध्ये फेरफारः पळविले 3 लाख; चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एटीएम मशीन मध्ये फेरफार करून चोरटयांनी ३ लाख १८ हजार पाठविल्याची घटना भांडारकर रस्त्यावरील एक एटीएम मशीन मध्ये घडली. याप्रकरणी या महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ब्रांच मॅनेजर मानसी सुनील कुळकर्णी (वय-५८, रा. शिवदर्शन चौक, पर्वती) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात ४ चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ एप्रिल रोजी ४ ते ५ वाजण्याच्या दरम्यान भांडारकर रस्त्यावरील गुप्ते हॉस्पिटल समोरील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या एटीएम मध्ये घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ४ चोरटे एटीएम मशीन मध्ये घुसले. त्यांनी बनावट चवीचा वापर करून मशीन उघडून सेटिंग मध्ये फेरफार केला. त्यानंतर ४ एचडीएफसी बँकेच्या एटीएम कार्डचा वापर करून २० वेळा ट्रान्झेक्शन करून ३ लाख १८ हजार काढत चोरून नेले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस शिंदे करत आहेत.

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. विजय अभिमन्यू तांदळे (वय २५, रा. वाघोली, नगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत विजय याची मावशी मनीषा बारगजे (वय ४६, रा. वाघोली, नगर रस्ता) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

दुचाकीस्वार विजय पहाटे पाचच्या सुमारास नगर रस्त्यावरुन निघाला होता. वाघोली परिसरात कावेरी हॉटेलसमोर दुचाकीस्वार विजयला भरधाव ट्रकने धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजयला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्य झाला. अपघातानंतर ट्रकचालक पसार झाला असून, त्याच्याविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक एन कोळपे पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments