इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : पुण्यात चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अशावेळी चोरी करण्यासाठी चोरटे अनेक युक्त्या वापरताना आपल्याला पहायला मिळतात. अशातच आता मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून अकरा लाख रुपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत पौड पोलिसात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मुळशी तालुक्यातील पिरंगुट येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ईटीएम मध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी प्रवीण चिमणदास बुटाला यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी बँकेंचे व्यवस्थापक प्रवीण चिमणदास बुटाला यांनी पौड पोलीसांत फिर्याद दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील पिरंगुट गावाच्या हद्दीत असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम आहे. या नोव्हेंबर महिन्यात चौथा शनिवार आणि रविवार असे जोडून आल्याने बँकेला दोन दिवस सुट्ट्या आले आहेत. यावेळी पैशांअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवारी (दि.22) सायंकाळी चार वाजता अकरा लाख रुपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यात आली होती. मात्र, सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तींनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून एटीएमच्या आतमध्ये असणारी अकरा लाख रुपयांची रक्कम पिशवीत भरुन घेऊन गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सोमवारी (दि.25) रोजी एटीएममधून कॅश निघत नसल्याने हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पौड पोलिस अधिक तपास करत आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश जाधव करत आहेत.