Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजएटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करणारे 2 चोरटे जेरबंदः पोलिसांच्या गस्ती पथकाने आवळल्या मुसक्या,...

एटीएममध्ये तांत्रिक छेडछाड करणारे 2 चोरटे जेरबंदः पोलिसांच्या गस्ती पथकाने आवळल्या मुसक्या, दोन्ही आरोपी राजस्थानचे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

विविध ठिकाणी लावण्यात आलेल्या एटीएम मशिनमध्ये तांत्रिक छेडछाड करून नागरिकांचे पैसे चोरणाऱ्या राजस्थान मधील चोरट्यांना अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.

सुभाष सारण (20) बिरबल सारण (20, दोघेही मूळ रा. बिंदासर, जि. चुरू, राजस्थान) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. कर्वे रस्ता परिसरातील एका एटीएम केंद्राजवळ आरोपी सुभाष सारण संशयित रित्या थांबला होते. अलंकार पोलिस ठाण्यातील पोलिस पथक त्या ठिकाणी गस्त घालत होते. त्यावेळी एटीएम केंद्राजवळ त्यांच्या संशयित हालचाली पोलिसांना दिसून आल्या. त्यांनी त्यांना हटकले असता. त्यांनी तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. चौकशीसाठी दोघांना ताब्यात घेऊन पोलिसांनी एटीएमची पाहणी केली असता एटीएममधून पैसे बाहेर पडणाऱ्या ठिकाणी त्यांनी प्लास्टिकची पट्टी लावल्याचे आढळून आले.

त्यातून सुभाष सारण यानी एटीएममधून पैसे काढणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. अलंकार पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीता रोकडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सुरेखा चव्हाण, उपनिरीक्षक अभिजीत चव्हाण यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.

एटीएम यंत्रात अशाप्रकारे केली जाते छेडछाड

एटीएम केंद्रात मशीन मधील ज्या भागातून पैसे बाहेर येतात. त्याठिकाणी आरोपींनी प्लास्टिक पट्टी लावली होती. एटीएममधून पैसे काढण्यासाठी नागरिक गेल्यानंतर पैसे बाहेर पडायचे नाही. प्लास्टिक पट्टीमुळे पैसे तेथेच अडकायचे. पैसे न मिळाल्याने एटीएम केंद्रातून नागरिक बाहेर पडले की. आरोपी सारण प्लास्टिक पट्टी काढून घ्यायचे. पट्टीमुळे अडकलेल्या नोटा चोरून काढून घेत ते पसार होत असे. आरोपींकडून आठ हजारांची रोकड आणि कार पोलिसांकडून जप्त करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments