Tuesday, April 29, 2025
Homeक्राईम न्यूजएचएसआरपीसाठी तीन लाखांवर वाहनधारकांचे अर्ज

एचएसआरपीसाठी तीन लाखांवर वाहनधारकांचे अर्ज

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणेः सन २०१९ पूर्वी खरेदी केलेल्या जुन्या वाहनांना अत्याधुनिक अशी हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत तीन लाखांहून अधिक वाहनधारकांनी अर्ज केले आहेत. सन २०१९ च्या पूर्वीच्या सर्व वाहनांना ३० जूनपूर्वी बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. सध्या ७० हजार वाहनांना एचएसआरपी बसविली आहे, अशी माहिती आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आली.

देशातील सर्व वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावणे बंधनकारक केले आहे. तेव्हापासून नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केली आहे. एप्रिल २०१९ नंतर बाजारात येणाऱ्या सर्व वाहनांना ही नंबरप्लेट बसवूनच विक्री करण्याचे अनिवार्य केलेले आहे. मात्र, २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांनादेखील परिवहन विभागाने एचएसआरपी नंबरप्लेट बंधनकारक केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments