Thursday, November 30, 2023
Home क्राईम न्यूज एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर...

एकीकडे म्हणायचं धनगरांना आरक्षण द्या अन् दुसरीकडे, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांवर पुन्हा निशाणा

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बीड | 12 ऑक्टोबर 2023 : भाजप आमदार गोपीचंद पडळकर वारंवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करताना दिसतात. आताही धनगर आरक्षणाच्या मुद्दयावरून पडळकरानी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. लेक आणि नातू म्हणतो, धनगर समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. तर आजोबा आदिवासी समाजात जाऊन म्हणतो, आदिवासींच्या आरक्षणात कुणाला घुसू देणार नाही. हे विरोधाभासी आहे, असं म्हणत गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवारांवर निशाणा साधला आहे. गोपीचंद पडळकर सध्या बीडमध्ये बोलत आहेत. तिथे त्यांनी पवारांवर टीका केलीय.

माझ्यावर कधीही हल्ला होऊ शकतो. कारण धनगर समाज उठला तर राजकारण करणं अवघड आहे. त्यामुळे गोपीचंदला संपवला पाहिजे, अशी लोकांची धारणा आहे. म्हणून मला संपवलं जाऊ शकतं. मात्र तरीही जीव गेला तरी बेहत्तर पण धनगर समाजाने एक झालं पाहिजे. सगळ्या बहुजन समाजाला एकत्र करण्याचं काम भंडारा करतो. त्यामुळे आपण एकत्र आलं पाहिजे, असं गोपीचंद पडळकर म्हणालेत.

चौंडीमध्ये 2006 सालपासून मी तिथं जातो. मात्र आम्हाला कुणीही अडवलं नाही. लबाड लंडग्याचं लबाड पिल्लू तिथे आमदार झाले आणि तिथं राजकारण आलं. माझ्या नातवाच्या मतदारसंघात अहिल्यादेवींचे जन्मस्थान आहे, असं पवार म्हणाले. त्या लंडग्याला पळवून लावण्याचं काम तिथे केले गेलं, असं म्हणत गोपीचंद पडळकरांनी टीका केली आहे.

मागासवर्गीय बहिणींच्या अंगावर हात घातला. म्हणून बापू बिरू वाटेगावकरांना हातात कुऱ्हाड घ्यावी लागली. त्यामुळे आपण कोणावर अन्याय करायचा नाही. मी सांगतो त्याप्रमाणे चला…. बघा तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. सरकार पण म्हणतंय की, राज्यात धनगड कोणीही नाही. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण मिळेल, असंही पडळकरांनी म्हटलं आहे.

RELATED ARTICLES

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

सात वर्षाच्या मुलीवर आत्याचार करणाऱ्या नराधमास बारा वर्षाची सक्तमजुरी…

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) राजगुरुनगरः चाकण येथे सात वर्षाच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमास राजगुरूनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीशांनी १२...

मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर कारवाई करा; पुणे महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालयांना आदेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सर्वोच्च न्यायालयाने दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार पुणे शहरातील सर्व आस्थापनांच्या पाट्या देवनागरी लिपीत...

ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचा बँक बॅलेन्स प्रॉपर्टी बाबतचा तपास करणार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : ससून रुग्णालयातून अमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या प्रकरणात अटक केलेल्या भूषण पाटील,...

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

Recent Comments