Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजएकाच वेळी 2 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा मजनू अटकेतः एकीने विचारणा केल्याने...

एकाच वेळी 2 तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा मजनू अटकेतः एकीने विचारणा केल्याने तरुणाची मारहाण, दोघींनीही प्रेमसंबंध तोडले

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुण्यात कर्वेनगर भागात राहणाऱ्या एका तरुणाने एकाच वेळी त्याच्या ओळखीची तरुणी आणि तिच्या मैत्रिणीशी प्रेमप्रकरण सुरू ठेवल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे याबाबत तरुणाला जाब विचारणाऱ्या तरुणीला रागाच्या भरात तरुणाने बेदम मारहाण केली. याप्रकरणी आरोपी तरुणाविरुद्ध अलंकार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आकाश अनिल शिंदे (२५, रा. वारजे, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुणी कर्वेनगर भागात राहण्यास आहे. तिचे आरोपी आकाश शिंदेशी प्रेमप्रकरण होते. आकाश शिंदे याने तरुणीच्या मैत्रिणीशी ओळख करून तिच्याशी काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंध निर्माण केले. तरुणीला याबाबतची माहिती समजली. त्या वेळी याबाबत तिने आकाश याला जाब विचारला. त्याचा राग आल्याने आकाशाने तरुणीला जोरात ठोसा मारला. त्याच्या हातातील अंगठी भुवईजवळ लागल्याने तरुणी जखमी झाली आहे. त्यानंतर तरुणीने याबाबतची माहिती तिच्या मैत्रिणीला दिली. मैत्रीण आणि तरुणीने आकाशशी असलेले प्रेमसंबंध तोडल्याने तो रागावला. आकाशने तरुणीला शिवीगाळ करून तिला जिवे मारण्याची धमकी दिली आहे. पोलिस उपनिरीक्षक एस गायकवाड पुढील तपास करत आहेत.

हैदराबादच्या तरुणाचा लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

: लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बळजबरीने बलात्कार करणाऱ्या हैदराबादधील तरुणाविरुद्ध हडपसर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तरुणीला प्रेमाचा जाळ्यात ओढून आरोपीने सात लाख रुपयेदेखील उकळल्याचे तरुणीने तक्रारीत सांगितले आहे. मोहंमद अबरार इब्राहिम शेख (३५, रा. बंजारा हिल्स, आसिफनगर, हैदराबाद) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी ३१ वर्षीय तरुणीने हडपसर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. तरुणी आणि आरोपी शेख यांची ऑनलाइन ओळख निर्माण झाली होती. मोहंमद शेखने तिला लग्नाचे आमिष दाखवले. शेख तरुणीला भेटण्यासाठी हैदराबाद येथून पुण्यात आला होता. तरुणीला हॉटेलमध्ये नेऊन त्याने बलात्कार केला. तरुणीकडे विविध कारणांची बतावणी करून त्याने वेळोवळी सात लाख रुपये उकळल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments