Thursday, November 7, 2024
Homeक्राईम न्यूजएकाच दिवसात तीन तडीपार गुंड ताब्यात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

एकाच दिवसात तीन तडीपार गुंड ताब्यात; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : तडीपारीचा भंग करुन पुण्यात येऊन राहणाऱ्या तीन तडीपार गुंडांना पोलिसांनी पकडले आहे. आतिश सुरज बाटुंगे (वय २५, रा. गायरान वस्ती, केशवनगर, मुंढवा) या तडीपार गुंडाला मुंढवा पोलिसांनी अटक केली आहे. आतिश बाटुंगे याला १२ ऑगस्ट २०२४ पासून २ वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. बाटुंगे हा केशवनगर येथील ओम साई चौकात पोलिसांना मंगळवारी रात्री दिसून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कंबरेला कोयता आढळून आला.

तसेच सहकारनगर पोलिसांनी धीरज रंगनाथ आरडे (वय २८, रा. तळजाई वसाहत) हा गुंड तडीपारीचा भंग करुन शहरात आलेला आढळून आला. आरोपी धीरज आरडे याला ६ जून २०२३ पासून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आपले होते. असं असतानाही तळजाई वसाहत येडेश्वरी मंदिराजवळ सोमवारी रात्री साडेदहा वाजता आढळून आला.

समर्थ पोलिसांनी मयुर दत्तात्रय थोरात (वय २५, रा. डोके तालीम मागे, नाना पेठ) या तडीपार गुंडाला अटक केली आहे. मयुर याला दोन वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले होते. असं असतानाही या तडीपारीचा भंग करुन मयुर थोरात हा आपल्या घरी रहात असल्याचे आढळून आले.

तसेच खडकी पोलिसांनी जय शशिकांत गायकवाड (वय १९, रा. पड्याळ वस्ती, खडकी) याला लोखंडी कोयता जवळ बाळगल्याप्रकरणी अटक केली आहे. दोन तलवारी, दोन कोयते जवळ बाळगणाऱ्या अथर्व अनिल आवळे (वय १९, रा. लक्ष्मी विहार बिल्डिंग, हिंगणे खुर्द) याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्याप्रमाणेच येरवडा पोलिसांनी १० हजार ४०० रुपयांचा ५२० ग्रॅम गांजा बाळगणाऱ्या गोरक्ष कचरु जगताप (वय २५, रा. गाडीतळ, येरवडा) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, आपल्या परीसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंडांना पोलीस एक ते दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करतात. मात्र, हे गुंड काही दिवसात परत आपल्या घरी येऊन राहून दहशत निर्माण करतात. त्यामुळे तडीपारीचा भंग करुन शहरात येऊन राहणाऱ्या तीन तडीपार गुंडांना पुणे पोलिसांनी एकाच दिवसात पकडल्याचे समोर आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments