Thursday, March 20, 2025
Homeक्राईम न्यूजएकाच दिवशी 5 गुंडांना केले तडीपार; हडपसरमधील दोघांचा समावेश

एकाच दिवशी 5 गुंडांना केले तडीपार; हडपसरमधील दोघांचा समावेश

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुणे परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एकाच दिवशी ५ सराईत गुंडांना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. आणखी १०० पेक्षा अधिक गुंड रडारवर असल्याची माहिती मिळत आहे. किशोर अमर सोळंकी (वय २१, रा. बिराजदारनगर, वैदुवाडी, हडपसर), अक्षय अनिल पवार (वय २७, रा. वेताळबाबा वसाहत, हडपसर), कादीर ऊर्फ काजु आरीफ अन्सारी (वय २१, रा. भाग्योदयनगर, कोंढवा खुर्द), साहील रफीक कलादगी (वय २१, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी), करण हरीदास जाधव (वय २४, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा) अशी तडीपार करण्यात आलेय गुंडांची नावे आहेत.

किशोर अमर सोळंकी याच्यावर जबरी चोरी, गंभीर दुखापत, बेकादेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे ४ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तर अक्षय अनिल पवार याच्यावर दुखापत, जबरी चोरी यासारखे ३ गुन्हे दाखल आहेत.

कादीर ऊर्फ काजु आरीफ अन्सारी याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दुखापत, जबरी चोरी, चोरी, बेकादेशीर शस्त्र बाळगणे यासारखे ७गुन्हे दाखल आहेत. साहील रफीक कलादगी याच्या विरुद्ध खासगी मालमत्तेचे नुकसान करणे, मारहाण, धमकावणे, दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे तीन गुन्हे दाखल आहेत. तर करण हरीदास जाधव याच्याविरुद्ध जबरी चोरी, दरोडा तयारी, चोरी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे, विनयभंग यासारखे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.

तडीपार केलेले पाचही गुंड हे २१ ते २५ वयोगटातील सराईत गुन्हेगार आहेत. २०२५ मध्ये यापूर्वी देखील सहा गुन्हेगारांना तडीपार करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिमंडळ पाचमधील १०० पेक्षा अधिक गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिस बारीक लक्ष ठेवून आहेत. सराईत गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून रोखणे आणि गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या रडारवरील आणखी १०० हून अधिक गुन्हेगारांवर मोक्का, एमपीडीए, तडीपारीची कारवाई करणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.

वरील तडीपार करण्यात आलेले सराईत गुन्हेगार पुढील दोन वर्षांच्या काळात पुणे शहर, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय आणि पुणे जिल्ह्यामध्ये दिसून आल्यास तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments