Monday, March 4, 2024
Home क्राईम न्यूज एकमेकांकडे पाहण्याच्या वादामधून चार अल्पवयीन मुलांनी विद्यार्थ्याला भोसकलेः पुण्यातील रामोशी गेट भागातील...

एकमेकांकडे पाहण्याच्या वादामधून चार अल्पवयीन मुलांनी विद्यार्थ्याला भोसकलेः पुण्यातील रामोशी गेट भागातील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

• गज आणि पट्ट्यानेही केली मारहाण

पुणे शहरातील रामोशी गेट परिसरात शाळकरी मुलांनी एका मुलावर धारदार चाकूने वार करून लोखंडी गज, पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेत शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी ४ शाळकरी मुलांना ताब्यात घेतले आहे.

याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खडक पोलिस ठाण्यात चार मुलांविरोधात तक्रार दिली आहे. तक्रारदार १५ वर्षीय अल्पवयीन मुलगा भवानी पेठेतील रामोशी गेट परिसरात असलेल्या पुणे महापालिकेच्या शाळेत दहावीत शिक्षण घेत आहे, तर चार अल्पवयीन मुले याच परिसरातील महापालिकेच्या उर्दू शाळेत दहावीत शिक्षण घेत आहेत. संबधित मुलांची पार्श्वभूमी ही गुन्हेगारी नाही. तक्रारदार अल्पवयीन मुलाची एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून एका मुलाशी २ दिवसांपूर्वी किरकोळ भांडणे झाली होती. त्यानंतर अल्पवयीन मुलाने या घटनेची माहिती शाळेतील मित्रांना दिली.

“तुझे बहुत मस्ती आयी हैं. दादागिरी करता है क्या?’

शाळकरी मुलगा रामोशी गेट परिसरातून निघाला होता. चारही मुलांनी त्याला अडवून शिवीगाळ केली. “तुझे बहुत मस्ती आयी हैं. दादागिरी करता है क्या?’ अशी विचारणा करून मुलाच्या छातीवर थेट धारदार चाकूने वार केले. तसेच लोखंडी गज, साखळी, चामडी पट्ट्याने त्याला बेदम मारहाण केली. काही नागरिकांनी हल्ला करणाऱ्या मुलांना रोखले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला ससून रुग्णालयात दाखल केले. गुन्हा दाखल झालेल्या मुलांच्या पालकांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. मुले अल्पवयीन असल्याने त्यांना अटक करण्यात आली नाही.

RELATED ARTICLES

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मेट्रोच्या अधिकाऱ्यांना घेतले पोलिस आयुक्तांनी फैलावर ; विद्यापीठ चौकातील कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील चौकात मेट्रोकडून संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना...

राणेंना दिलेली सवलत पुणेकरांनाही देणार का?

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - सामान्य नागरिकाने मिळकतकराची संपूर्ण थकबाकी भरल्या शिवाय महापालिका सील केलेली इमारत पुन्हा उघडू देत नाही. मात्र, केंद्रीय...

ओझर येथील लॉजवर डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर पोलीसांकडून सुटका

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) ओतूर - ओझर, ता. जुन्नर येथील लॉजमध्ये शेअर मार्केट मधील गुंतवलेले पैसे लगेच मिळावे म्हणून डांबून ठेवलेल्या इसमाची ओतूर...

ड्रग्ज प्रकरणातील बर्मनकडे एमडीचा साठा मिळण्याची शक्यता

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे - अमली पदार्थ तस्करी प्रकरणात पोलिसांनी मोठी छापेमारी केल्यानंतर आरोपी सुनील बर्मन (रा. मधभंगा, कुचबिहार, पश्चिम बंगाल) याने...

Recent Comments