Wednesday, April 17, 2024
Homeक्राईम न्यूजएकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्लाः तरुणाकडून महिलेसह सासूवर घरात शिरून हल्ला, आरोपी ...

एकतर्फी प्रेमातून जीवघेणा हल्लाः तरुणाकडून महिलेसह सासूवर घरात शिरून हल्ला, आरोपी फरार

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून घरात बळजबरीने शिरून महिला आणि तिच्या सासूवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना कोंढवा भागात घडली आहे. यानंतर पसार झालेल्या तरुणाचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे. आरोपीने महिलेच्या सासूच्या डोक्यात सिलिंडर फेकून मारल्याने त्यांना दुखापत झाली आहे.

याप्रकरणी भीमाशंकर नावाच्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला एका खासगी रुग्णालयात सहायक परिचारिका आहे. आरोपी भीमाशंकर रुग्णालयात सफाई कर्मचारी आहे. मागील काही दिवसांपासून भीमाशंकर महिलेला वारंवार त्रास देत होता. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे सांगून तिचा पाठलाग करायचा.

संपूर्ण प्रकरण काय…

महिला कोंढवा भागात राहायला आहे. आरोपी तिच्या घरी गेला. माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे त्याने सांगितले. त्यावेळी मी विवाहित असून, मला दोन मुले आहे, असे महिलेने सांगितले. त्यावेळी महिला, तिचा मुलगा, सासू, जाऊ घरात होते. मला त्रास देऊ नको, असे तिने त्याला सांगितले.

त्यानंतर आरोपी भीमाशंकरने महिलेच्या घरात आरडाओरड करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सासूने त्याला थेट जाब विचारला मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यावेळी घरात असलेल्या जावेने खोलीचा दरवाजा बंद केला. तिने परिसरातील रहिवाशांना या प्रकाराची माहिती दिली. आरडाओरडा ऐकून रहिवासी तेथे जमा झाले. तेव्हा सदर बंद खोलीत असलेल्या भीमाशंकरने सिलिंडरने लाकडी दरवाजा तोडला. त्यावेळी सासू, महिलेने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु महिला आणि सासूवर भीमाशंकरने सिलिंडर फेकून मारण्याचा प्रयत्न केला. झटापटीत सिलिंडर महिलेच्या सासूच्या डोक्याला लागल्याने दुखापत झाली. दरवाजा उघडून तो पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या भीमाशंकरचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरिक्षक विकास बाबर पुढील तपास करत आहेत.

पुण्यातील कालव्यात बुडून 14 वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्देवी मृत्यू

पुणे शहरातील पर्वती भागात जनता वसाहतीतील कालव्यात पोहण्यासाठी उतरलेल्या एका 14 वर्षीय शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून दुर्देविरीत्या मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घडली आहे.

चैतन्य विवेक किराड (वय 14, रा. रामोशी गेट, भवानी पेठ, पुणे) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. चैतन्य किराड आणि त्याचे मित्र शनिवारी जनता वसाहत परिसरातील कालव्यातील पाण्यात पोहण्यासाठी गेले होते. पोहण्यासाठी उतरलेला चैतन्य हा कालव्यात अचानक बुडाला. त्यामुळे त्याच्या मित्रांनी आरडाओरड केली. तसेच स्थानिक नागरिक देखील मदतीसाठी धावले. या घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी शोधमोहिम राबविली. शनिवारी सायंकाळी चैतन्य याचा मृतदेह कालव्यातून बाहेर काढण्यात आला. उन्हाळ्यात कालव्यात अनेकजण पोहायला जातात. पोहताना खोलीचा अंदाज न येणे, तसेच दमछाक झाल्याने दुर्घटना घडतात, अशी माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली असून पाण्यात पोहताना मुलांनी काळजी घ्यावी असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

पुणे स्टेशन भागात प्रवाशाला लुटणारा रिक्षाचालक जेरबंदपुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला लुटणाऱ्या एका रिक्षाचालकाला बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. चाँद पाशा फरीदसाब (वय 36, रा. गोंधळेनगर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. याबाबत एका तरुणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरुण कात्रजकडे निघाला होता. रिक्षाचालक चाँदने पुणे स्टेशन परिसरातील सम्राट हॉटेलजवळील गल्लीत रिक्षा थांबविली. त्याला मारहाण करून खिशातील रोकड आणि मोबाइल संच असा मुद्देमाल लुटून चाँदसाब पसार झाला. घाबरलेल्या तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तपास करून चाँदसाबला पकडले. सहायक फौजदार विठू बोने पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments