इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
नवी दिल्ली : एअर इंडियाचा कायापालट होताना आता दिसत आहे.कारण, ही कंपनी टाटा ग्रुपकडे गेली आहे. कंपनीकडून मोठ्या संख्येने मोठी विमाने खरेदी करण्याचीही तयारी सुरू आहे. एअर इंडिया अमेरिकन कंपनी बोईंग आणि युरोपच्या एअरबसकडून जवळपास 50 मोठी विमाने खरेदी करणार असल्याचे म्हटले जात आहे.
एअर इंडिया 30 ते 40 मोठी विमाने खरेदी करण्याचा विचार करत आहे. यामध्ये Airbus A350 आणि Boeing 777X मॉडेल्सचा समावेश असू शकतो. ही संख्या 50 पेक्षा जास्त असू शकते. असे जरी असले तरी अद्यापही चर्चा सुरू असून यावर निर्णय झाला नसल्याची माहिती आहे. जूनपर्यंत एअर इंडिया किती विमाने खरेदी करणार याची माहिती मिळू शकणार आहे.
गेल्या वर्षी एअर इंडियाने 470 विमाने खरेदी करण्याचा करार केला होता. याशिवाय कंपनीने गेल्या वर्षी एअरबसकडून 100 विमाने खरेदी करण्याचा करारही केला होता. यातील बहुतांशी लहान आकाराची विमाने होती. एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपले स्थान निर्माण करता यावे यासाठी आता कंपनीने मोठी विमाने म्हणजेच ‘वाईड बॉडी विमाने’ खरेदी करण्याची योजना आखली आहे.