Tuesday, October 29, 2024
Homeक्राईम न्यूजऊसाचा डम्पिंग ट्रेलर अंगावर पडुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; शिरसगाव काटा धुमाळवाडी येथील...

ऊसाचा डम्पिंग ट्रेलर अंगावर पडुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू; शिरसगाव काटा धुमाळवाडी येथील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

रांजणगाव गणपती : शिरुर तालुक्यातील शिरसगाव काटा येथीलधुमाळवाडी येथे पंक्चर झालेला ऊसाचा डम्पिंग ट्रेलर अंगावर पडुन तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सचिन दत्तात्रय जगताप (वय- 32) (रा. शिरसगाव काटा ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.

शिरुर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुमाळवाडी येथील शिवारात संतोष दत्तात्रय जगताप (वय-35) हे शेतातील ऊस ट्रॅक्टरने बाहेर काढत होते. यावेळी त्यांचा डम्पिंग ट्रेलर पंक्चर झाला होता.

पंक्चर काढताना जॅक निसटल्याने ट्रेलर संतोष यांच्या अंगावर पडला. यावेळी ते गंभीर जखमी झाल्याने त्यांना न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारापुर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलीसांनी सदर प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments