इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
दौंड : उसने पैसे देण्याच्या कारणावरून चौघांनी एकाला केबल वायरच्या तुकड्याने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. दौंड परिसरातील नगरमोरी येथे हॉटेल योगराज समोर गुरुवारी (ता. 20) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.
आकाश कांबळे, रोहित कलाल (रा. दोघेही खाटीक गल्ली, दौंड) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मंगेश संजय चितारे (वय 25, व्यवसाय खाजगी नोकरी रा. नगरमोरी जवळ जठार वस्ती, आर.बी. वन, दौंड ता. दौंड) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हॉटेल योगराज समोर उसने पैसे देण्याच्या कारणावरून आकाश कांबळे, रोहित कलाल आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी जवळच पडलेल्या केबलचे वायरच्या तुकडयांनी फिर्यादी मंगेश चितारे यांच्या पाठीत, डोक्यात व मानेवर मारून दुखापत केली. तसेच मारहाण करताना मोबाइल फोडला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, याप्रकरणी आकाश कांबळे, रोहित कलाल (रा. खाटीक गल्ली, दौंड) आणि त्यांच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2), 352, 351(2), 3(5), 324(4) नुसार दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस हवालदार शेख करत आहेत.