Saturday, February 15, 2025
Homeक्राईम न्यूजउसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्रानेच लाकडी दांडक्याने फोडले डोके !

उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून मित्रानेच लाकडी दांडक्याने फोडले डोके !

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पिंपरी : शहरातील भोसरी भागातून एक धक्कादायक घटनासमोर आली आहे. व्यक्तिगत खर्चासाठी उसने दिलेले पैसे परत मागितल्यामुळे मित्रालाच लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरामध्ये भोसरीतील खंडेवस्ती भागात घडली आहे. याप्रकरणी अमित महादेव घाटे (वय ३६, रा. खंडेवस्ती, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. फिर्यादीनुसार भोसरी पोलीस ठाण्यात मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमितने आपल्या एका मित्राला काही दिवसांपूर्वी उसने पैसे दिले होते. बऱ्याच दिवसानंतर ते पैसे परत मागितले असता मित्राने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हाताने मारहाण केली. तसेच लाकडी दांडक्याने अमितच्या डोक्यात, पाठीवर आणि कपाळावर मारून गंभीर जखमी केले. आणि जर का परत पैसे मागितले तर ‘तुला बघून घेईन’, अशी तंबी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments