इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) : शिंदवणे (ता. हवेली) येथील संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना लोहयुक्त बाजरी व झिंक युक्त गहू पासून बनवलेले न्यूट्रीबार व खाकरा देण्यात आला आहे. प्रकल्पाअंतर्गत शाळेमध्ये पुढील सहा महिने हा पौष्टिक आहार देण्यात येणार आहे. अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक सुरेश कांचन यांनी दिली.
शालेय मुलाना पोषणयुक्त अन्न पुरवठ्यासाठी हैप्पल फाउंडेशन, हार्वेस्टप्लूसा एग्रोज़ी ऑर्गेनिक्स प्रा. लि. यानी हंसा (शालेय वयोगटातील मुलांसाठी आरोग्य आणि पोषण) हा प्रकल्प शनिवारी (ता. 15) सुरु करण्यात आला आहे. तसेच पोषक मित्र मॉडेलचा पहिला प्रयोग करण्यात आला.
यावेळी संत यादवबाबा माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश कांचन, शिक्षक दादा लांडे, रमेश विचारे, संजय कोकणर, कल्याणी भोसले, रेखा जाधव, भाग्यश्री दळवी, विकास कुंजीर, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रकल्प हंसा ला 29 फेब्रुवारी 2023 रोजी सोनारी येथे सुरुवात करण्यात आली व त्यामध्ये 18 शाळा व 3 हजार विद्यार्थी झाले व ह्या शैक्षणिक वर्षात पुणे, नंदुरबार व अन्नमित्र फाउंडेशन असे मिळून 65 हजार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच 2025 पर्यंत 20 लाख शालेय विद्यार्थ्यांच्या आहारात लोहयुक्त बाजरी व झिंक युक्त गव्हापासून बनवलेल्या पदार्थाचा समावेश करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
दैनंदिन जीवनात पौष्टिक आहाराचा सातत्याने पुरवठा होत राहणे त्याचबरोबर आरोग्याची काळजी व रोजच्या जेवणामध्ये पौष्टिक अन्नाचा समावेश असला पाहिजे, या सर्व गोष्टींची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक आहे. याच उद्देशाने शाळेमध्ये आरोग्य क्लब सुरु करण्यात आला आहे. पोषक मित्र मोडेन शाळेमध्ये बसवण्यात आले जेणेकरून मुले नियमित चांगल्या सवईचे अनुकरण करतील.
दरम्यान, विद्यार्थ्यांमध्ये जसे की हात धुणे, पौष्टिक खाणे असे अनुकरण करतील. आरोग्य क्लबमध्ये विद्यार्थीकरीता रंगीबेरंगी चित्रे व त्यावरील आरोग्यदायी संदेश काढण्यात आले आहेत. त्यांना शारीरिक क्रियाकलाप करण्यासाठी दोरीउडी, योगा मट व बास्केट बॉल यासारखी साधने देण्यात आली. जेणेकरून विद्यार्थी त्याचे अनुकरण करू शकतील.