इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन, (पुणे) उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत एका45 वर्षीय महिलेचा शेतातील विहीरीत मृतदेह आढळल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. 22) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वसंत कांचन यांच्या शेतातील विहीरीत हा मृतदेह आढळून आला.
जयश्री भैरवनाथ दिवे (वय 45, रा. पाटीलवस्ती, रानमळा उरुळी कांचन ता. हवेली) असे मृतदेह आढळून आलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचे पती भैरवनाथ सोपान दिवे (वय 52, रा. पाटीलवस्ती रानमळा) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पत्नी जयश्री ही घरातील काम करत होती. त्यानंतर दोघांनी जेवण केले व पती भैरवनाथ दिवे हे झोपी गेले. झोपेतुन उठल्यावर दुपारी तीन वाजता पत्नी जयश्री ही घरात दिसून आली नाही. त्यामुळे त्यांचा शोध घराजवळ तसेच वसंत कांचन यांच्या शेतात घेतला यावेळी वसंत कांचन यांच्या शेतातील विहीरीत पत्नी जयश्री विहीरीत पालथी तरंगत असल्याचे दिसून आले.
सदरची माहिती मेहुणा किरण जाधव, सुरेश मच्छींद्र जाधव व मुलगा अमोल दिवे यांना दिली. त्यांच्या मदतीने पत्नी जयश्रीला विहीरीतुन बाहेर काढले. यावेळी अम्बुलन्स मधुन उरुळी कांचन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासुन उपचारापुर्वीच मयत झाल्याचे सांगितले.
दरम्यान, सदर घटनेबाबत कोणाविरुध्द काही एक तक्रार किंवा संशय नसल्याचा जबाब पती भैरवनाथ दिवे यांनी उरुळी कांचन पोलिसात दिला आहे. त्यानुसार उरुळी कांचन पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. तपास पोलीस हवालदार निलेश जाधव करीत आहेत.