Thursday, June 13, 2024
Homeक्राईम न्यूजउरुळी कांचन येथे लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी आलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून कपडे...

उरुळी कांचन येथे लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी आलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून कपडे फाडले, अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत चौघांवर गुन्हा दाखल

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन, (पुणे) : लग्नाबाबत बोलणी करण्यासाठी आलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार उरुळी कांचन परिसरात उघडकीस आला आहे. तसेच पीडित महिलेच्या अंगातील कपडे फाडून महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी चौघांवर अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हि घटना सोमवारी (ता. 27) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील दातार कॉलनी परिसरात घडली आहे. याप्रकरणी एका महिलेने उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार आदम तांबोळी, रसीद तांबोळी, साहील तांबोळी, अझहर तांबोळी (रा. सर्व दातार कॉलनी, उरुळी कांचन ता. हवेली) असे अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उरूळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत लग्नाबाबत बोलणे करण्यासाठी पिडीत महिला व त्याच्या सोबत परिसरातील काही महिला आल्या होत्या. यावेळी आदम तांबोळी याने लग्नास नकार देवुन त्याने तसेच रसीद तांबोळी, त्यांचा मुलगा साहील तांबोळी, आदम तांबोळी, अझहर तांबोळी यांनी आलेल्या सर्व महिलांकडे पाहून जातीवाचक शिवीगाळ केली.

दरम्यान, साहील तांबोळी याने पीडित महिलेच्या अंगातील टॉप गळ्याजवळ फाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न असे वर्तन केले. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार वरील चौघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अॅट्रॉसिटीसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्निल जाधव करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments