Saturday, March 15, 2025
Homeक्राईम न्यूजउरुळी कांचन येथे तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

उरुळी कांचन येथे तरुणावर कोयत्याने खुनी हल्ला

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

उरुळी कांचन : शिंदवणे रस्त्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञाततिघांनी एका 32 वर्षीय तरुणावर ऊस तोडण्याच्या कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे उरुळी कांचन रोडवरील चिंतामणी वॉशिंग सेंटर जवळ बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

निखिल एकनाथ खेडेकर (वय 32, धंदा खाजगी नोकरी रा. शिंदवणे खेडेकर आळी, ता. हवेली) असे या जीवघेण्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. खेडेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दुचाकीवरून आलेल्या तिघांवर उरुळी कांचन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी निखिल खेडेकर व त्यांचा मित्र सतीश चंद्रकांत वाघमोडे (रा. शिंदवणे) हे दोघेजण बुधवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटार सायकलवरून शिंदवणे येथून उरुळी कांचनकडे निघाले होते. यावेळी शिंदवणे बाजूकडून अज्ञात तिघेजण हे दुचाकीवर पाठीमागून आले. यावेळी मध्यभागी बसलेल्या इसमाने निखिल खेडेकर याच्या डोक्यात ऊस तोडणीचे कोयत्याने हल्ला केला.

दरम्यान, या हल्ल्यात निखिल खेडेकर हा जखमी झाला. तर मोटार सायकलवरील तिघांपैकी एकाने फिर्यादी खेडेकर याला शिविगाळ करुन त्यांच्या ताब्यातील मोटार सायकलसह निघून गेले. या प्रकरणी जखमी खेडेकर यांनी अज्ञात तिघांविरुद्ध उरुळी कांचन पोलिसांत फिर्याद दिली असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments