इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
उरुळी कांचन : जागतिक महिला दिनाचेऔचित्य साधून उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने समाजात विशेष योगदान देणाऱ्या महिलांचा व आदर्श मातांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.
उरुळी कांचन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन यशाच्या शिखरावर पोहोचवले आहे. या पाच आदर्श मातांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला. यामध्ये मंगल पांडुरंग मोरे (कोरेगाव मुळ), मिनाबाई आबासाहेब शेंडगे (खामगाव टेक, ता. हवेली), वसुमतीबेन विजयराज ओसवाल, नंदिनी दत्तात्रय महाडीक (सर्व शिंदवणे, ता. हवेली) व जनाबाई शिवाजी कांचन (नायगाव, ता. हवेली) यांचा समावेश होता. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 60 महिलांचाही सन्मान दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस, वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील व उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नुरजहाँ सय्यद यांच्या करण्यात आले.
उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या वतीने ” शक्ती अभियान” अंर्तगत “महीलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन” कार्यक्रमाचे अनुषंगाने बापुराव दडस यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात “शक्ती अभियान” अंतर्गत महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. शक्ती बॉक्स, शक्ती हेल्पलाइन नंबर 7218112100 आणि शक्ती कक्षासंदर्भात उपस्थितांना सविस्तर माहिती देण्यात आली.
दरम्यान, कायदेविषयक जागृतीसाठी अॅड. पिंकी राजगुरू यांनी महिलांना नव्या कायद्यांविषयी मार्गदर्शन केले. कार्यकमाचे प्रस्ताविक उरुळी कांचन पोलीस स्टेशच्या महिला पोलीस उपनिरीक्षक मिरा मटाले यांनी केले. उरुळी कांचन पोलीस स्टेशनच्या या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे