Tuesday, December 3, 2024
HomeUncategorizedउरुळी कांचनला दुपारी 12 पर्यंत 25 टक्के तर भवरापूर व टिळेकरवाडीला सर्वाधिक...

उरुळी कांचनला दुपारी 12 पर्यंत 25 टक्के तर भवरापूर व टिळेकरवाडीला सर्वाधिक मतदान

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

लोणी काळभोर, (पुणे) राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. राज्यात संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे. बुधवारी सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत. सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत उरुळी कांचन येथे 25 टक्के मतदान झाले आहे. अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.

उरुळी कांचन व परिसरात सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरळीत सुरु आहे. उरुळी कांचनसह परिसरातील गावांमध्ये अद्यापपर्यंत सुरळीत मतदान सुरु असून मतदान करण्यासाठी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. परिसरातील कोरेगाव मूळ, सोरतापवाडी, पेठ, नायगाव, शिंदवणे, टिळेकरवाडी, खामगाव टेक परिसरात उत्स्फूर्तपणे तरुणाई व ज्येष्ठ नागरिक हजेरी लावत असून परिसरात उरुळी कांचन पोलीस बीएसएफ जवानांचा मोठा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदानाची गावनिहाय टक्केवारी

-उरुळी कांचन – 20 टक्के

-कोरेगाव मूळ – 30 टक्के

-टिळेकरवाडी – 40

– भवरापूर – 39

-शिंदवणे – 25

– तरडे – 20

– सोरतापवाडी – 25

– खामगाव टेक – 30

-पेठ – 35

-नायगाव – 25

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments