Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजउपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा; प्रशासनाकडे मागणी

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करा; प्रशासनाकडे मागणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. भविष्यात पुणेकरांना भीषण पाणी टंचाईला समोर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करून पाण्याची बचत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अविनाश खंडारे यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

गेल्यावर्षी कमी पाऊस पडल्याने धरणांमध्ये कमी पाणीसाठा शिल्लक आहे. सध्या १० टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये शेतीसाठीचे एक आवर्तन आहे. त्यामुळे पिण्यासाठी ६ टीएमसी पाणी उपलब्ध असणार आहे.

दरवर्षी पाण्याचा साठा बघून पाणी बचतीचा निर्णय घेतला जातो. पण यंदा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठलेही नाही. यासाठी सत्ताधारी पक्षाचा प्रशासनावर दबाव असणार, हे देखील आम्हाला ज्ञात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी १३ मे रोजी झाल्यानंतर राज्यकर्ते पुणेकरांच्या पाण्याविषयी जो काही निर्णय असेल तो प्रशासनाने घ्यावा अशी भूमिका घेतली. तो पर्यंत पाणी साठ्याची स्थिती अधिक चिंताजनक होईल. याचा विचार प्रशासनाने करावा. पुणेकरांना उन्हाळ्यातही पाणी टंचाई निर्माण होईल नये यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे अशी मागणी खंडारे यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments