Friday, April 19, 2024
Homeक्राईम न्यूजउपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम...

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले: जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करतात; पुणे पोलिसांची कारवाई अभिमानास्पद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात मोठी कारवाई केली असून ती अभिमानास्पद आहे. नजीकच्या काळातील देशातील ही सर्वात मोठी कारवाई आहे. ड्रग फ्री महाराष्ट्र ही मोहीम आपण राज्यात राबवत आहे. अमली पदार्थ हे समाजाला आणि तरुणाईला उद्ध्वस्त करण्याचे काम केले जाते. जे काम बंदुकीची गोळी करू शकत नाही ते काम अमली पदार्थ करत आहे. याबाबत झीरो टोलरेंसे भूमिका आम्ही मांडली ती राज्यातील पोलिसांनी गांभीर्याने घेतली असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.

पुणे पोलिसांनी ड्रग संदर्भात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल गृहमंत्री यांनी पोलिसांचे कौतुक केले. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त प्रवीण पवार, अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त अमोल तांबे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, आपण विचार केला पाहिजे की, पुणे पोलिसांनी जप्त केलेला अमली पदार्थ साठा किती घरापर्यंत पोहचून ते उद्ध्वस्त झाले असते. अनेक ठिकाणी ड्रग कारखाने टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. अमली पदार्थ मध्ये पैशाची देवाण घेवाण मोठ्या प्रमाणात असल्याने लालसेने कारवाई केली जात नाही. पुणे पोलिसांनी अतिशय चांगले काम केले आहे, त्यामुळे यात ज्यांनी उत्कृष्ठ काम केले त्यांचा सत्कार करण्यात आला आहे. आपल्या समोर नेमके काय आव्हान आहे हे पहिले पाहिजे. यातून आपल्याला काय शिकण्यास मिळते तर छोट्या साठ्यातून मोठ्या साठ्या पर्यंत पोहचले पाहिजे. ड्रग कुठे तयार होते, ते कशाप्रकारे विक्री होते, त्यात कोण सहभागी आहे याचा तपास झाला पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नॅशनल कॉन्फरन्स मध्ये यात सर्व यंत्रणा यांनी एकत्रित काम करावे. परदेशात याचे धागेदोरे जोडले असून नवीन पद्धती ओळखून त्यावर कारवाई करावी लागेल. राज्यातील पोलीस यापुढे अधिक चांगले काम करतील. पुणे पोलिसांना मी २५ लाखांचा पुरस्कार जाहीर करत आहे. नवीन ऊर्जेने ड्रग विरोधात मोहीम लढवत राहावी.

अमितेश कुमार म्हणाले, पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाई बद्दल या कामगिरीत उल्लेखनीय काम केलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान करण्यासाठी राज्याचे गृहमंत्री आज पुण्यात आले आहे. यावेळी नेमके कशा प्रकारे पुणे पोलिसांनी ड्रग बाबत कामगिरी केली त्याची माहिती देण्यात आली. या कारवाईत दिल्ली, सांगली आणि पुणे येथून १८०० किलो एमडी ड्रग जप्त केले आहे. ड्रग रॅकेट मध्ये आंतरराष्ट्रीय संबंध दिसून आले आहे यादृष्टीने केंद्रीय तपास यंत्रणा यांना माहिती देण्यात आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments