इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणेः संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी नुकतीच आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. महाराजांवर त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज होतं. त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेला चिठ्ठीत कर्जाचा उल्लेख केला होता. आत ३२ लाखाच्या कर्जाची रक्कम देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत विजय शिवतारे यांनी मोरे कुटुंबियांची भेट घेऊन रक्कम सुपूर्द केली आहे.
अधिक माहिती अशी की, संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज दिवगंत शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली ५ फेब्रुवारी रोजी शिरीष महाराज यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनेमुळे देहूत दुःखाचे सावट ओढवले गेले होते. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी चार चिठठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यापैकी एका चिठ्ठीत त्यांच्यावर ३२ लाखांच कर्ज असल्याचा उल्लेख त्यांनी केला होता.
त्याच बरोबर कर्ज घेतलेल्यांची नावेही त्यात लिहिली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत दखल घेत विजय शिवतारे यांच्या हस्ते ३२ लाख कर्जाची रक्कम मोरे कुटुंबाला सुपूर्द केली आहे. यावेळी महाराजांनी आत्महत्या करायला नको होती असे विजय शिवतारे म्हणाले.