इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन
(संपादक सुरेश गुप्ता)
पुणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार विजय शिवतारे यांनी आयोजित केलेल्या आभार यात्रा सभेत घणाघाती टीका केली आहे. ज्यांनी ‘बाळासाहेबांचे, आनंद दिघे यांचे विचार सोडले त्यांचा जनतेने विधानसभा निवडणुकीत धुव्वा उडवला,’ अशी टीकाउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.
अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पुरंदर-हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी आभार सभा आयोजित केली होती. या निमित्त उपमुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, रोजगार आणि फलोत्पादनमंत्री भरत गोगावले, आमदार विजय शिवतारे, ममता शिवतारे, रमेश कोंडे, अतुल मस्के या वेळी उपस्थित होते. या सभेत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मयूर मुळीक आणि उरुळी देवाची गावचे माजी सरपंच तात्यासाहेब भाडळे (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
महायुती सरकारने सुरू केलेल्या योजना बंद होणार नाहीतः उपमुख्यमंत्री शिंदे
या सभेत बोलताना शिंदे म्हणाले ‘महायुती सरकारने सुरू केलेली कोणतीही योजना बंद पडणार नाहीत. या लोकसभा निवडणुकीत देखील आमच्या शिवसेनेला दोन लाख मते उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त मिळाली आहेत. तर विधानसभेत १५ लाख मते त्यांच्यापेक्षा ज्यास्त मिळाली आहेत. आमच्या ८० पैकी ६० जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची’ हे सांगायची गरज नाही. यामधून ‘बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार खऱ्या अर्थाने पुढे कोण नेणार हे स्पष्ट आहे ज्यांनी त्यांचे विचार सोडले, त्यांना जनतेने योग्य वाट दाखवली आहे. असे उपमुख्यमंत्री शिंदे या सभेत बोलताना म्हणाले आहेत.
शिंदे पुढे बोलताना म्हणाले, ‘मागील अडीच वर्षात महायुतीला केवळ शिव्या देण्यात आल्या. मात्र, आम्ही आरोपांना कामातून प्रतिउत्तर दिले आहे. त्यामुळे महायुतीचा विजय झाला आहे. लोकसभेनंतर केवळ चार-पाच महिन्यांमधेच जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. घरात बसून राज्य करता येत नाही,’ हे जनतेने दाखवून दिले आहे’ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
आमदार विजय शिवतारे म्हणाले..
पुढच्या ‘दीड वर्षामध्ये कुठल्याही परिस्थितीत गुंजवणीचे पाणी पुरंदरमध्ये आणणार आहे. आता या योजनेपैकी सहा किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. येथील पुरंदर विमानतळही विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे,’ असे विजय शिवतारे या आभार सभेत बोलताना म्हणाले.