Monday, May 20, 2024
Homeक्राईम न्यूजउपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले: केंद्राचा निधी आणून बारामतीचा कायापालट करण्यासाठी खासदारकी आम्हाला...

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले: केंद्राचा निधी आणून बारामतीचा कायापालट करण्यासाठी खासदारकी आम्हाला हवी आहे

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

बारामतीकरांनी मला नेहमी प्रतिसाद दिला तसाच अगामी लोकसभा निवडणुकीत प्रतिसाद दिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी विकासकामासाठी पाठपुरावा करु शकतो. राज्याचे अर्थमंत्रीकडे सहा लाख कोटी अाहे तर केंद्राकडे किती पैसा हाती असेल याचा विचार करा. केंद्राचा निधी अाणून बारामतीचा कायापालट करण्यासाठी खासदारकी अाम्हाला हवी अाहे. निवडणुकीत फॉर्म भरल्यावर विरोधकांची अाधी केवळ शेवटी सभा होत होती. परंतु अाता सर्वत्र फिरावे लागते. माझ्यावर विश्वास नाही का? प्रशासनावर पकड नाही का? माझ्या जिल्हा, राज्याकरिता काम करत होतो. माझी विचारधारा मी सोडलेली नाही. सर्व समाजाला सोबत घेऊन पुढे जात आहे. विकासाचा वेग चालू ठेवण्यासाठी भावनिक होऊ नका तर मला पाठबळ द्या. बघू, करु, ये उद्या अशी माझी कामाची पध्दत नसून कोणतेही काम करण्याची धमक माझ्यात अाहे असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी व्यक्त केले.

बारामती तालुका व शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अाजी माजी पदाधिकारी यांचे मेळाव्यात ते बोलत होते. पवार म्हणाले, जे साखर कारखाने अडचणीत होते व त्यांचा अायकर मोठया प्रमाणात होता. त्यांचे अायकर कमी करण्याचे काम केंद्र सरकारकडे पाठपुरावा करुन मी केले अाहे. बारामती सहकारी बँक अडचणीत येत होती परंतु सदर बँकेचा व्यवहार सुरळित करुन ठोस निर्णय घेऊन बँक पूर्वपदावर अाणली. बारामती मध्ये विकास योग्यप्रकारे सुरु असून त्यामुळे गुंतवणुक करण्यास कामानिमित्ताने अनेकजण याठिकाणी येत अाहे. ज्यांना बारामती सुरक्षित वाटते असा मोठा वर्ग बारामतीत रहाण्यास अाला अाहे. बारामती परिसरातील तीन साखर कारखान्यांचे पेमेंट झाल्याशिवाय लोकांना हातात पैसे मिळत नव्हते.

परंतु आता परिस्थिती बदलली असून बारामही लोकांचे इतर व्यवसाय सुरु होऊन चांगल्याप्रकारे प्रगती होत अाहे. बारामती मधील नदी अाटली होती, विहिरींना पुरेसे पाणी नाही. राज्यात ४० तालुके दुष्काळी जाहीर करण्यात अालेले अाहे. त्याबाबत प्रशासकीय स्तरावर उपाययोजना सुरु करण्यात अाल्या अाहे. बारामतीचा चेहरामोहरा बदलण्यासाठी प्रयत्न मी केला. विद्यमान खासदारांसह काहीजणांनी स्वतःचे पुस्तिकेत सांगितले की, नगरपालिका इमारत, पोलीस अॉफीस, अत्याधुनिक बसस्थानक, उद्योग विस्तारीकरण, रस्ते रुंदीकरण, एमआयडीसी जागा अधिग्रहण अाम्ही केले. याबाबतचे डिझाईन करुन पैसे देत पाठपुरावा करण्याचे काम मी केले.

सर्व छोट्या मोठ्या गोष्टीत लक्ष्य दिले, रोजगार निर्मितीचे काम केले. पुरंदर मध्ये ५८ कोटीची विकासकामे करण्यात येत अाहे. पुणे व पिंपरी चिंचवड शहर हे ३० टीएमसी पाणी वापरत अाहे त्यांना तितके पाणी द्यावे लागते. पुरंदर उपचा सिंचन योजना बारामही सुरु राहील, गुंजवणे, नाझरा योजना देखल कार्यरत करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments