Tuesday, February 27, 2024
Home क्राईम न्यूज उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रियाः पार्थ पवार अन् गुंड गजा मारणेची भेट अतिशय...

उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रियाः पार्थ पवार अन् गुंड गजा मारणेची भेट अतिशय चुकीचे पण..

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पार्थ पवार आणि गुंड गजा मारणेची भेट अतिशय चुकीचे असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. अजित पवार म्हणाले, पार्थ पवार यांनी गुंड गजा मारणेची जी भेट घेतली आहे ते अतिशय चुकीचे झाले आहे. पण, पार्थ ज्या घरी गेला होता, त्याठिकाणी गजा मारणे आला होता. माझ्यासोबत देखील असाच प्रकार घडला होता, मात्र मी आता या संदर्भात काळजी घेतो आणि पोलिसांना आधीच सांगून ठेवतो, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गजा मारणे अन् पार्थ पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे.

पुण्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत सातत्याने चर्चा होत असते. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांनी पदाधिकाऱ्यांसह गुंड गजा मारणेच्या घरी भेट दिली. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. तसेच, या भेटीवर अनेक प्रश्न देखील उपस्थित झाले आहेत. त्यावरून विरोधकांनी अजित पवार गटांवर निशाणा साधला आहे. या संदर्भात अखेर अजित पवारांनी भाष्य केले आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाकडून पुण्यातील विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पार्थ पवार, माजी नगरसेवक बंडू केमसे, माजी महापौर दत्ता धनकवडे, माजी नगरसेवक दीपक मानकर हे कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी गजा मारणे आणि पत्नी जयश्री मारणे यांची पार्थ पवारांनी भेट घेतली, तेव्हा गजा मारणेकडून पुष्पगुच्छ देऊन पार्थ पवारांचे स्वागत करण्यात आले. त्यामुळे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

सध्या जामीनावर बाहेर

गजा उर्फ महाराज उर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशी तालुक्यातील एका छोट्या गावात जन्मलेला तरुण आहे. पुण्यातील कोथरूड परिसरातील शास्त्रीनगर परिसरात राहण्यासाठी आल्यानंतर गजा मारणे गुन्हेगारीकडे वळला. त्यानंतर आतापर्यंत त्याची गुन्हेगारी सुरूच आहे. पुण्यातील घायवळ गँग आणि मारणे गँग यातील वर्चस्वाचा वाद पुण्यात एकेकाळी प्रचंड गाजला. त्यानंतर अमोल बधे आणि पप्पू गावडे खून प्रकरणात गजा मारणे याला अटक झाली. तो 3 वर्ष येरवडा कारागृहात होता. तो आता मारणे टोळीचा म्होरक्या असून आजवर या टोळीवर 23 होऊन अधिक गुन्हे दाखल आहेत. तर गजा मारणेवर सहा पेक्षा अधिक खुनाचे गुन्हे दाखल आहेत. मागील वर्षी पुण्यातील व्यावसायिकाला 20 कोटी रुपयांची खंडणी मागणी केल्याप्रकरणात कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.

RELATED ARTICLES

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

पुण्यातील नशेचा हादरवणारा व्हिडिओ, वेताळ टेकडीवर नशेत गुंग तरुणी

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) प्रत्येक पुणेकरांना विचार करण्याची वेळ आली आहे. अन्यथा शिक्षणाचे माहेरघर असलेले पुणे शहर उडता पंजाब होईल, नशेचे माहेरघर होईल,...

जेवण वाढताना वाद; महिलेकडून पतीवर चाकूने वार, भवानी पेठेतील घटना

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : जेवण वाढताना वाद झाल्याने महिलेने पतीवर चाकूने वार केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. याप्रकरणी महिलेविरुद्ध गुन्हा...

पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार...

पुण्यातील तरुणाई ड्रग्सच्या नशेत? रमेश परदेसींकडून हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे : शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यातून एक धक्कादायक (Pune Drugs) आणि राज्याला हादरवून टाकणारा व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यातील...

Recent Comments