Wednesday, November 29, 2023
Home क्राईम न्यूज उपचार कसले? पाहुणचारच ! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने...

उपचार कसले? पाहुणचारच ! पुण्याच्या ससून रुग्णालयात ड्रग माफियांची अनेक महिने बडदास्त

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन

(संपादक सुरेश गुप्ता)

पुणे : ससून रुग्णालयाच्या गेटवरून २ कोटी १४ लाखांचे मेफेड्रॉन जप्त केल्यानंतर या अंमली पदार्थांच्या तस्करीचा सूत्रधार ललित पाटील ससूनमध्ये महिनोनमहिने उपचार घेत असल्याचे समोर आले आहे. याआधीदेखील फेक एन्काउंटरमध्ये अटकेत असलेल्या प्रदीप शर्मानेही ससूनमध्ये असाच पाहुणचार झोडला होता. तुरुंगात जे करता येत नाही ते ससूनमध्ये उपचारांच्या नावाखाली करता येते, असा समज यामुळे होत असून, ससूनमधील वरिष्ठ अधिकारी आणि ड्रग माफिया यांची मिलिभगत आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

ललित पाटील गेल्या जून महिन्यापासून ससूनमध्ये अल्सर, टीबी आणि हार्निया उपचारासाठी मुक्काम ठोकून आहे. अल्सरचा उपचार आठवड्याभरात होऊ शकतो. इतकेच नव्हे, तर कितीही मोठी शस्त्रक्रिया असली, तरी जास्तीत जास्त महिनाभरात पेशंट बरा होतो. मात्र ललित पाटील एवढ्या महिन्यांपासून कुणाच्या आशीर्वादाने ससूनमध्ये होता, असा प्रश्न विचारला जात असून याबाबतची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

तोंड उघडाल तर खबरदार: अधीष्ठात्यांचा दम

ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांनी ससूनमधील सर्व डॉक्टर, कर्मचारी यांनी या प्रकरणाबाबत कोणालाही काहीही माहिती देऊ नका, अशी धमकीच दिली आहे. त्यामुळे येथे कोणी काहीच बोलत नाही. तसेच, या प्रकरणाबाबत डॉ. ठाकूर यांना फोनवरून संपर्क केला असता त्यांनीदेखील प्रतिसाद दिला नाही.

अधिष्ठात्यांच्या युनिटमध्ये उपचार?

ललित पाटील याच्यावर सध्या अल्सरसाठी उपचार सुरू असून, ते उपचार खुद्द ससूनचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर यांच्याच युनिटमध्ये सुरू असल्याची माहिती ससूनमधील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चर्चेचा विषय ठरत आहे.

आधी टीबी आता अल्सर

ललित पाटील हा दर वेळी वेगवेगळी कारणे सांगून ससूनमध्ये दाखल झाला आहे. याआधी तो जिन्यातून पडला म्हणून, नंतर टीबी झाला, हर्निया आणि आता अल्सरच्या उपचारासाठी तब्बल चार महिन्यांपासून उपचार घेत असल्याचे समोर आले आहे.

कैदी वॉर्डचे सीसीटीव्ही बंद

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने ३० सप्टेंबर रोजी ससून रुग्णालयासमोर २ कोटी १४ लाख ३० हजार रुपये किमतीचे मॅफेड्रोन जप्त केल्या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील रुग्णालयातील ज्या कैदी वॉर्डमध्ये उपचार घेत आहे, तेथील सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बंद असल्याचे समोर आले आहे. तसेच, ललितकडे दोन महागडे आणि नवे फोन आढळले असून ते त्याच्यापर्यंत कसे पोहोचले, याचा शोध पोलिस घेत आहेत.

ललित पाटीलवर अजूनही उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्याला ससूनमधून डिस्चार्ज दिल्यावर तो पुन्हा येरवडा कारागृहात जाईल. त्यानंतर पुणे पोलिस चाकणप्रकरणी खेड न्यायालयाला या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याला ताब्यात घेण्याची विनंती करतील.

– सुनील थोपटे,

वरिष्ठ पोलिस निरीक्षक

ललित पाटील याच्या नाशिकमधील घरी गुन्हे शाखेचे पथक गेले असता, त्याच्या घरचे सदस्य आधीच पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्या जवळच्या सगळ्यांचे मोबाइलही बंद आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सुभाष जानकी मंडल (२९, रा. देहूरोड, मूळ रा. झारखंड) आणि रऊफ रहीम शेख (१९, रा. ताडीवाला रोड) या दोघांना अटक केली

या प्रकरणाबाबत प्राथमिक अहवाल मी ससूनच्या अधिष्ठात्यांकडून मागवला आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी समितीद्वारे केली जाईल.

RELATED ARTICLES

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

झोपेच्या जागेवरून झालेल्या भांडणाचा हिंसक शेवट, तरूणाची हत्या करणाऱ्या दोघांना अटक

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : मुंबईत रहाणं हे दिवसेंदिवस अतिशय महाग होत चाललंय हे तर सगळ्यांनाच माहीत आहे....

२२ वर्षीय तरुणीने केली २ कोटींची फसवणूक, कंपनीकडून माल घेऊन पैसे दिलेच नाहीत

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पिंपरी : तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने विविध फर्म बनवून एका कंपनीकडून तब्बल दोन कोटी रुपयांचा माल खरेदी केला....

पुण्यात गारपीट अन् जोरदार पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) पुणे पुणे शहरात आणि जिल्ह्यात काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून शिरूर, आंबेगाव तालुक्यात गारपीट देखील झाली आहे....

आंबेगाव तालुक्यातील अवसरी परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

इंडिया क्राइम न्यूज़ ऑनलाइन (संपादक सुरेश गुप्ता) अवसरी आयेगाव तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या जवसरी खुर्द, अवसरी बुद्दक, गावडेवाडी या परिसरात पाऊस झाला. अवसरी खुर्द येथे साडेतीन...

Recent Comments